Ads

दहीहंडा पोलिसांचा गोमांस वाहतुकीचा पर्दाफाश.१३५ किलो गोमांस, ३ मोटारसायकली जप्त; तिघांना बेड्या

By Nilesh Sir

May 10, 2026 12:48 pm

Ads

अकोला जिल्ह्यातील दहीहंडा पोलीस स्टेशन हद्दीत पहाटेच्या सुमारास पोलिसांनी मोठी कारवाई करत गोमांस वाहतुकीचा प्रकार उघडकीस आणला आहे. गोमांस वाहतूक सुरू असल्याची गोपनीय माहिती मिळताच पोलिसांनी विशेष पथक तयार करून सलग तीन ठिकाणी छापेमारी केली. या कारवाईत तब्बल १३५ किलो गोमांस, तीन मोटारसायकली आणि एकूण २ लाख ७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दिनांक १० मे २०२६ रोजी पहाटे ४ वाजताच्या सुमारास पोलिसांना गोमांस वाहतुकीबाबत माहिती मिळाली होती. त्यानुसार दहीहंडा पोलिसांनी विविध ठिकाणी सापळे रचत कारवाई केली.

पहिली कारवाई ग्राम कुटासा स्मशानभूमीजवळ करण्यात आली. यावेळी आरोपी अब्दुल बशीर शेख अखिल (वय ५५, रा. दहीहंडा) याच्या ताब्यातून अंदाजे ५० किलो गोमांस आणि होंडा शाईन मोटारसायकल असा एकूण ७५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

दुसरी कारवाई ग्राम कुटासा बसस्टॉप परिसरात करण्यात आली. येथे मोहम्मद शहजाद अब्दुल बशीर (वय २४, रा. दहीहंडा) याच्याकडून ४० किलो गोमांस आणि हिरो होंडा स्प्लेंडर मोटारसायकल असा ६८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

तिसरी कारवाई कावसा प्राथमिक आरोग्य केंद्राजवळ करण्यात आली. या ठिकाणी शेख राजा शेख अमीर (वय ३१, रा. पिंपळद, ता. दर्यापूर, जि. अमरावती) याच्याकडून ४५ किलो गोमांस आणि स्प्लेंडर मोटारसायकल असा ६९ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

विशेष म्हणजे, या तिन्ही कारवायांमध्ये पोलिसांनी एकूण १३५ किलो गोमांस आणि तीन मोटारसायकली जप्त केल्या असून, एकूण मुद्देमालाची किंमत २ लाख ७ हजार रुपये असल्याची माहिती समोर आली आहे.

या सलग कारवायांमुळे दहीहंडा परिसरात मोठी खळबळ उडाली असून, गोमांस वाहतूक आणि अवैध धंद्यांवर पोलिसांनी मोठा घाव घातल्याची चर्चा रंगू लागली आहे दहीहंडा ठाणेदार गोपाल ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सागर कापसे पोलीस कर्मचारी प्रमोद लांडगे रवी डाबेराव अमोल पवार प्रदीप तायडे यांनी यशस्वी कारवाई केली.पुढील तपास पोलीस करीत आहेत.

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!