Ads

पुण्यानंतर अकोल्यात हादरवणारी घटना; 60 वर्षीय नराधमाचा चिमुकलीवर अत्याचार

By Nilesh Sir

May 6, 2026 4:27 pm

Ads

अकोला जिल्ह्यातील पातुर तालुक्यातून मानवतेला काळीमा फासणारी संतापजनक घटना समोर आली आहे. राज्यभर नसरापूर आणि पुण्यातील धक्कादायक घटनांमुळे संतापाची लाट उसळलेली असतानाच आता पातुर तालुक्यातील एका गावात 60 वर्षीय वृद्धाने 10 वर्षीय चिमुकलीवर अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसर हादरला असून नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना चान्नी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील एका गावात घडली. पीडित मुलीचे आई-वडील शेतात मजुरीसाठी गेल्यानंतर शेजारी राहणाऱ्या वृद्ध नराधमाने संधी साधत चिमुकलीवर वारंवार अत्याचार केल्याचा आरोप आहे. गेल्या 4 ते 5 दिवसांपासून हा प्रकार सुरू असल्याचे समोर आले आहे.

भीतीमुळे पीडित मुलगी काही दिवस गप्प राहिली. मात्र, मंगळवारी 5 मे रोजी तिने धैर्य एकवटत आई-वडिलांना घडलेला प्रकार सांगितला. मुलीची आपबीती ऐकताच कुटुंबीयांच्या पायाखालची जमीन सरकली. त्यांनी तात्काळ चान्नी पोलीस स्टेशन गाठून आरोपीविरोधात तक्रार दाखल केली.

घटनेची माहिती मिळताच आरोपी वृद्ध गावातून फरार झाला. पोलिसांनी तत्काळ गुन्हा दाखल करत आरोपीच्या शोधासाठी 3 ते 4 विशेष पथके रवाना केली आहेत. आरोपी जवळच्या जंगलाच्या दिशेने पळाल्याची प्राथमिक माहिती समोर आली असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

या प्रकरणाबाबत पोलिसांनी सांगितले की, आरोपी आणि पीडित कुटुंब शेजारी राहत होते. दोन्ही कुटुंबांमध्ये चांगले संबंध होते. मात्र, विश्वासाचा गैरफायदा घेत आरोपीने अत्यंत घृणास्पद कृत्य केल्याचे समोर आले आहे. सध्या परिसरात पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला असून परिस्थिती नियंत्रणात असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

दरम्यान, या घटनेनंतर पातुर तालुक्यात संतापाची लाट उसळली आहे. स्थानिक नागरिक, सामाजिक संघटना आणि महिलांनी आरोपीला कठोरात कठोर शिक्षा देण्याची मागणी केली आहे. अल्पवयीन मुलींवरील वाढत्या अत्याचारांच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून अशा नराधमांविरोधात जलद न्याय आणि कठोर कारवाईची मागणी जोर धरत आहे.

Related Article

दुष्काळाचा बाजारपेठेला फटका! अकोल्यात डाळींच्या किमतीत १० ते १५ टक्क्यांनी वाढ; तांदळाचे दरही गगनाला

संगीता कुशवाह मृत्यू प्रकरण: सासरच्या तिघांचा अटकपूर्व जामीन फेटाळला; सरकारी वकिलांचा युक्तिवाद ठरला महत्त्वाचा

दुचाकी-ट्रकची जोरदार धडक; २२ वर्षीय युवक गंभीर जखमी, प्राथमिक उपचारानंतर अकोल्यातील सर्वोपचार रुग्णालयात हलविले

अकोला जिल्ह्यात दुष्काळी पंचनाम्यांना वेग; आतापर्यंत 1.85 लाख शेतकऱ्यांच्या 3.06 लाख हेक्टर क्षेत्राचे पंचनामे

महिला सक्षमीकरणाला बाळापूर नगरपालिकेची चालना; १०० महिलांना शिलाई प्रशिक्षणाची प्रमाणपत्रे

पातूरमध्ये शाळेतील प्रवेशासाठी १० ते १५ हजार रुपयांची मागणी? खासगी शाळांवर पालकांचे गंभीर आरोप

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!