Ads

अकोटमार्गे होणार होती गावठी पिस्टलची विक्री; ३ आरोपी जेरबंद

By Nilesh Sir

May 2, 2026 5:27 pm

Ads

अकोला जिल्ह्यात अवैध अग्निशस्त्रांविरोधात सुरू असलेल्या ‘ऑपरेशन प्रहार’ अंतर्गत स्थानिक गुन्हे शाखेला मोठे यश मिळाले आहे. स्थानिक गुन्हे शाखा, अकोला यांच्या पथकाने सापळा रचून तीन आरोपींना अटक करत दोन देशी बनावटीची गावठी पिस्टल, दोन जिवंत काडतुसे, मोटरसायकल आणि मोबाईल असा तब्बल २ लाख २२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांनी १५ एप्रिल ते ३० एप्रिल २०२६ या कालावधीत अकोला जिल्ह्यात ‘ऑपरेशन प्रहार’ राबवत अवैध अग्निशस्त्रे आणि अंमली पदार्थांविरोधात कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले होते.

याच पार्श्वभूमीवर ३० एप्रिल रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला गुप्त माहिती मिळाली की, मध्यप्रदेशातील पाचुरी गावातून दोन इसम काळ्या रंगाच्या विनानंबर मोटरसायकलवर अवैध अग्निशस्त्र विक्रीसाठी नेर फाटा मार्गे चोहोट्टा, ता. अकोट येथे येणार आहेत.

ही माहिती मिळताच पोलीस निरीक्षक शंकर शेळके यांनी वरिष्ठांना माहिती देऊन त्यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे विशेष पथक घटनास्थळी रवाना केले. पोलिसांनी सापळा रचत संशयितांना ताब्यात घेतले.ताब्यात घेतलेल्या आरोपींची नावे दत्ता महादेव मोहोड (वय २५, रा. उमरी, ता. तेल्हारा) आणि अक्षय संतोष मोहोड (वय २४, रा. नवी उमरी, ता. तेल्हारा) अशी आहेत.

पंचांसमक्ष घेतलेल्या अंगझडतीदरम्यान अक्षय मोहोड याच्या कमरेला लपवून ठेवलेले मॅगझीनसह देशी बनावटीचे गावठी पिस्टल आढळून आले. त्याची अंदाजे किंमत ४० हजार रुपये असल्याचे सांगण्यात आले. तर दत्ता मोहोड याच्याकडून अग्निशस्त्रामध्ये वापरण्यात येणारे जिवंत काडतूस जप्त करण्यात आले.

दरम्यान, पोलिसांनी दोघांकडे अग्निशस्त्र बाळगण्याचा परवाना विचारला असता त्यांनी कोणताही परवाना नसल्याचे कबूल केले.पोलिसांनी अधिक चौकशी केली असता आरोपी दत्ता मोहोड याने सात ते आठ दिवसांपूर्वी एक गावठी पिस्टल आणि जिवंत काडतूस बुलढाणा जिल्ह्यातील पातुर्डा येथील शेख अकबर शेख हारूण याला विकल्याची माहिती दिली.

ही माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने पातुर्डा येथे धाड टाकली. भिम नगर, ईदगाह प्लॉट परिसरातून शेख अकबर शेख हारूण याला ताब्यात घेत त्याची चौकशी करण्यात आली. यावेळी त्याने स्वतःकडे असलेले गावठी पिस्टल आणि जिवंत काडतूस पंचांसमक्ष पोलिसांच्या स्वाधीन केले.

या संपूर्ण कारवाईदरम्यान पोलिसांनी आरोपींकडून दोन गावठी पिस्टल, दोन जिवंत काडतुसे, एक बजाज मोटरसायकल आणि दोन मोबाईल फोन असा एकूण २ लाख २२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

या प्रकरणी तिन्ही आरोपींविरोधात भारतीय शस्त्र अधिनियम कलम ३ आणि २५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील कारवाईसाठी आरोपींना दहीहंडा पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे.ही संपूर्ण कारवाई पोलीस अधीक्षक अर्चित चांडक, अपर पोलीस अधीक्षक बी. चंद्रकांत रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शंकर शेळके आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली.

अकोला जिल्ह्यात वाढत्या अवैध अग्निशस्त्रांच्या हालचालींवर पोलिसांनी लावलेला हा मोठा लगाम मानला जात असून ‘ऑपरेशन प्रहार’ अंतर्गत पुढेही अशाच धडक कारवाया सुरू राहणार असल्याचे संकेत पोलिस प्रशासनाकडून देण्यात आले आहेत.

Related Article

प्रेमाचा करुण अंत! विहिरीत उडी घेतलेल्या प्रियकराचा मृत्यू; तरुणीनेही केले विषप्राशन

सातपुड्याच्या हिरवाईला दारूच्या बाटल्यांचा डाग!पावसाळी पर्यटनाच्या नावाखाली मद्यपानाचा धुमाकूळ?

सातपुड्याच्या ‘एंट्री गेट’वरच CCTV बंद! पोपटखेड तपासणी नाका वनविभागाच्या भरवशावर; सुरक्षेवर गंभीर सवाल

रक्षाबंधनच्या पूर्वसंध्येला पाच वर्षांनी हरवलेल्या महिलेची कुटुंबीयांशी पुनर्भेट; आधार ठरला शोधाचा महत्त्वाचा दुवा

हिवरखेडमध्ये महायुतीचा ‘महासंग्राम’! भाजप-शिंदेसेना आमनेसामने; नगरपालिकेत जोरदार राडा

दानापूरमध्ये ईद-ए-मिलादचा जल्लोष! आकर्षक देखाव्यांसह भव्य मिरवणूक; सामाजिक सलोखा अन् बंधुभावाचे दर्शन

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!