Ads

अकोट ग्रामीण पोलिसांची धडक कारवाई!भररस्त्यावर दहशत निर्माण करणारा इसम ताब्यात

By Nilesh Sir

April 19, 2026 9:54 pm

Ads

अकोट ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत भरदिवसा एका इसमाने हातात धारदार खंजीर घेऊन रस्त्यावर दहशत माजवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मात्र, पोलिसांनी तत्काळ कारवाई करत आरोपीला ताब्यात घेत मोठा अनर्थ टाळला.

दि. १९ एप्रिल २०२६ रोजी अकोट ग्रामीण पोलिसांना गुप्त माहिती मिळाली की, हिवरखेड रोडवरील साई पेट्रोलपंपसमोर एक इसम हातात लोखंडी सुरा (खंजीर) घेऊन सार्वजनिक ठिकाणी आरडा-ओरडा करत येणाऱ्या-जाणाऱ्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण करत आहे.

या माहितीवरून पोलिस पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेत पंचासमक्ष कारवाई केली. संबंधित इसमाला ताब्यात घेतल्यावर त्याच्याकडून एक धारदार लोखंडी खंजीर जप्त करण्यात आला. चौकशीदरम्यान आरोपीने आपले नाव शेख जलील शेख खलील (वय २७ वर्ष, रा. सिव्हिल लाईन, दर्यापूर जि. अमरावती) असे सांगितले.

खंजीराबाबत विचारले असता आरोपीने उडवाउडवीची उत्तरे दिल्याने पंचासमक्ष सुमारे २०० रुपयांचा लोखंडी सुरा जप्त करण्यात आला. आरोपीला अटक करून त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र पोलिसांच्या तत्परतेमुळे परिस्थिती नियंत्रणात आली.

पोलीस प्रशासनाने नागरिकांना आवाहन केले आहे की, अशा प्रकारे कोणीही दहशत निर्माण करताना दिसल्यास तात्काळ अकोट ग्रामीण पोलीस स्टेशनला माहिती द्यावी.

सदर कारवाई पोलीस अधीक्षक अर्चित चांडक, अप्पर पोलीस अधीक्षक बी. चंद्रकांत रेड्डी, सहायक पोलीस अधीक्षक निखिल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक किशोर जुनघरे आणि त्यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.

Related Article

दुष्काळाचा बाजारपेठेला फटका! अकोल्यात डाळींच्या किमतीत १० ते १५ टक्क्यांनी वाढ; तांदळाचे दरही गगनाला

संगीता कुशवाह मृत्यू प्रकरण: सासरच्या तिघांचा अटकपूर्व जामीन फेटाळला; सरकारी वकिलांचा युक्तिवाद ठरला महत्त्वाचा

दुचाकी-ट्रकची जोरदार धडक; २२ वर्षीय युवक गंभीर जखमी, प्राथमिक उपचारानंतर अकोल्यातील सर्वोपचार रुग्णालयात हलविले

अकोला जिल्ह्यात दुष्काळी पंचनाम्यांना वेग; आतापर्यंत 1.85 लाख शेतकऱ्यांच्या 3.06 लाख हेक्टर क्षेत्राचे पंचनामे

महिला सक्षमीकरणाला बाळापूर नगरपालिकेची चालना; १०० महिलांना शिलाई प्रशिक्षणाची प्रमाणपत्रे

पातूरमध्ये शाळेतील प्रवेशासाठी १० ते १५ हजार रुपयांची मागणी? खासगी शाळांवर पालकांचे गंभीर आरोप

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!