Ads

अकोट उपविभागीय पोलीस अधिकारी पथकाची मोठी कारवाई: हिवरखेडमध्ये प्रतिबंधित गुटखा जप्त

By Nilesh Sir

April 18, 2026 10:02 am

Ads

अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्यात ऑपरेशन ‘प्रहार’ अंतर्गत पोलिसांनी मोठी कारवाई करत महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला तंबाखूजन्य गुटखा जप्त केला आहे. या कारवाईत ₹1,16,182 किमतीचा गुटखा पंचासमक्ष जप्त करण्यात आला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दिनांक 16 एप्रिल 2026 रोजी सहाय्यक पोलीस अधीक्षक अकोट यांना गोपनीय माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलीस स्टेशन हिवरखेड हद्दीत 17 एप्रिल रोजी पहाटे सुमारे 12:15 वाजता छापा टाकण्यात आला. या छाप्यात आरोपी संदीप चिंतामण खिरोडकार (रा. हिवरखेड) याच्या राहत्या घरातून विविध कंपन्यांचा मोठ्या प्रमाणात प्रतिबंधित गुटखा साठा आढळून आला.

पोलिसांनी तात्काळ कारवाई करत संपूर्ण मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी पोलीस स्टेशन हिवरखेड येथे गुन्हा नोंदवण्यात आला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गोपाल गिलबिले करत आहेत.

ही कारवाई पोलीस अधीक्षक अकोला अर्चित चांडक, अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत रेड्डी, सहाय्यक पोलीस अधीक्षक अकोट निखील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.

कारवाई पथकात पोउपनि. गोपाल गिलबिले यांच्यासह बजरंग गळे, अनिल सिरसाट, नरेंद्र जाधव, गणेश साबळे, गोपाल निकमर्डे, गोविंद अवारे आणि नेहा सोनवणे यांचा समावेश होता.

Related Article

दुष्काळाचा बाजारपेठेला फटका! अकोल्यात डाळींच्या किमतीत १० ते १५ टक्क्यांनी वाढ; तांदळाचे दरही गगनाला

संगीता कुशवाह मृत्यू प्रकरण: सासरच्या तिघांचा अटकपूर्व जामीन फेटाळला; सरकारी वकिलांचा युक्तिवाद ठरला महत्त्वाचा

दुचाकी-ट्रकची जोरदार धडक; २२ वर्षीय युवक गंभीर जखमी, प्राथमिक उपचारानंतर अकोल्यातील सर्वोपचार रुग्णालयात हलविले

अकोला जिल्ह्यात दुष्काळी पंचनाम्यांना वेग; आतापर्यंत 1.85 लाख शेतकऱ्यांच्या 3.06 लाख हेक्टर क्षेत्राचे पंचनामे

महिला सक्षमीकरणाला बाळापूर नगरपालिकेची चालना; १०० महिलांना शिलाई प्रशिक्षणाची प्रमाणपत्रे

पातूरमध्ये शाळेतील प्रवेशासाठी १० ते १५ हजार रुपयांची मागणी? खासगी शाळांवर पालकांचे गंभीर आरोप

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!