Ads

ऑपरेशन प्रहारचा धडाका! दहीहंडा पोलिसांची मोठी कारवाई; 1.07 लाखांचा गुटखा जप्त

By Nilesh Sir

April 16, 2026 12:11 pm

Ads

अकोला जिल्ह्यात सुरू असलेल्या “ऑपरेशन प्रहार” मोहिमेअंतर्गत प्रतिबंधित गुटखा व सुगंधित तंबाखू विक्री आणि वाहतुकीवर पोलिसांनी मोठा आघात केला आहे. पोलीस अधीक्षक यांच्या आदेशानुसार दहीहंडा पोलीस स्टेशन हद्दीत ही महत्त्वपूर्ण कारवाई करण्यात आली.

दि. 16 एप्रिल 2026 रोजी पहाटे मिळालेल्या खात्रीलायक माहितीच्या आधारे किनखेड पुर्णा फाटा येथे नाकाबंदी करण्यात आली. यावेळी पांढऱ्या रंगाच्या Suzuki Burgman (MH 30 BY 0825) स्कुटीवरून येणाऱ्या संशयित इसमाची तपासणी करण्यात आली असता त्याच्याकडे मोठ्या प्रमाणात प्रतिबंधित गुटखा व सुगंधित तंबाखू आढळून आला.

या प्रकरणी आरोपी रेहान शहा रफीक शहा (वय 19, रा. चोहोट्टा बाजार) याच्याविरुद्ध दहीहंडा पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीकडून विविध कंपन्यांचा गुटखा व तंबाखू किंमत रु. 27,550/- तसेच वाहतुकीसाठी वापरलेली स्कुटी किंमत रु. 80,000/- असा एकूण रु. 1,07,550/- चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

ही कारवाई अपर पोलीस अधीक्षक आणि उपविभागीय पोलीस अधिकारी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली, ठाणेदार गोपाल ढोले पोलीस उपनिरीक्षक कापसे व त्यांच्या पथकाने यशस्वीरित्या पार पाडली.

जिल्ह्यात गुटखा व तंबाखू माफियांविरुद्ध पोलिसांचा ‘प्रहार’ सुरूच राहणार असून, अशा अवैध व्यवसायांना थारा दिला जाणार नाही, असा स्पष्ट इशारा प्रशासनाने दिला आहे.

Related Article

दुष्काळाचा बाजारपेठेला फटका! अकोल्यात डाळींच्या किमतीत १० ते १५ टक्क्यांनी वाढ; तांदळाचे दरही गगनाला

संगीता कुशवाह मृत्यू प्रकरण: सासरच्या तिघांचा अटकपूर्व जामीन फेटाळला; सरकारी वकिलांचा युक्तिवाद ठरला महत्त्वाचा

दुचाकी-ट्रकची जोरदार धडक; २२ वर्षीय युवक गंभीर जखमी, प्राथमिक उपचारानंतर अकोल्यातील सर्वोपचार रुग्णालयात हलविले

अकोला जिल्ह्यात दुष्काळी पंचनाम्यांना वेग; आतापर्यंत 1.85 लाख शेतकऱ्यांच्या 3.06 लाख हेक्टर क्षेत्राचे पंचनामे

महिला सक्षमीकरणाला बाळापूर नगरपालिकेची चालना; १०० महिलांना शिलाई प्रशिक्षणाची प्रमाणपत्रे

पातूरमध्ये शाळेतील प्रवेशासाठी १० ते १५ हजार रुपयांची मागणी? खासगी शाळांवर पालकांचे गंभीर आरोप

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!