अकोला न्यूज नेटवर्कने काही दिवसांपूर्वी उघड केलेल्या गोमांस तस्करीच्या बातमीला आता प्रत्यक्ष घटनांनी दुजोरा मिळत आहे. मूर्तिजापूर शहरात अवैध गोवंश कत्तल आणि मांस विक्रीचा व्यवसाय मोठ्या प्रमाणात सुरू असल्याचे सलग तिसऱ्या कारवाईतून स्पष्ट झाले आहे.
मूर्तिजापूर शहर पोलिसांनी मोहम्मदिया प्लॉट आणि देवरण रोड परिसरात धडक कारवाई करत एक पांढरी दोन वर्षांची कालवड आणि तब्बल ८५ किलो गोमांस जप्त केले. या प्रकरणात आरोपी शेख इब्राहिम शेख जब्बार (३८) आणि मोहम्मद दानिश मोहम्मद इकबाल (२४) यांना ताब्यात घेण्यात आले आहे. तसेच कत्तलीसाठी वापरले जाणारे वजन काटा, माप आणि इतर साधनसामग्रीही जप्त करण्यात आली.
धक्कादायक बाब म्हणजे, हा संपूर्ण प्रकार पॉश बंगल्या प्रकारच्या घरातून सुरू होता. यामुळे शहराच्या मध्यभागीच एवढा मोठा अवैध व्यवसाय सुरू असताना प्रशासनाचे डोळे झाकले गेले होते का, असा गंभीर प्रश्न उपस्थित होत आहे.

विशेष म्हणजे, ही सलग तिसरी कारवाई असूनही नगरपालिका प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. नगरपालिका हद्दीत उघडपणे अवैध कत्तलखाने सुरू असताना प्रशासन मौन का? हा सवाल आता नागरिकांमध्ये संतापाचे रूप घेत आहे.
पोलिसांनी ठाणेदार अजित जाधव यांच्या नेतृत्वाखाली आक्रमक भूमिका घेत या रॅकेटवर मोठा प्रहार केला आहे. पोलीस अधीक्षक अर्पित चांडक, अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत रेड्डी आणि उपविभागीय पोलीस अधिकारी वैशाली मुळे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.
मात्र प्रश्न कायम आहे… पोलिस कारवाई करत आहेत, पण नगरपालिका प्रशासन काय करत आहे? एवढ्या मोठ्या प्रमाणात अवैध धंदा सुरू असताना त्याकडे दुर्लक्ष का केले गेले?
ही केवळ कायद्याची पायमल्ली नसून, प्रशासनाच्या कार्यक्षमतेवरच मोठे प्रश्नचिन्ह उभे करणारी बाब आहे. आता या प्रकरणात संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई होणार का, की पुन्हा एकदा हे प्रकरण दाबले जाणार, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.







Leave a Comment