Ads

गोवंश तस्करीचा मोठा भंडाफोड! बोलेरोतून कत्तलीसाठी जनावरे वाहतूक; अकोट ग्रामीण पोलिसांची धडक कारवाई

By Nilesh Sir

April 6, 2026 5:32 pm

Ads

अकोट तालुक्यात गोवंश तस्करीविरोधात पोलिसांनी मोठी कारवाई करत बोलेरो पिकअपसह तब्बल ५,०४,२५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली असून बेकायदेशीर कत्तलीच्या प्रकारांवर मोठा आळा बसण्याची शक्यता आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांना गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली होती की, अकोलखेड येथून मोहाळा गावाकडे एका पांढऱ्या बोलेरो पिकअप वाहनातून गोवंश जनावरे कत्तलीसाठी नेली जात आहेत. या माहितीच्या आधारे पोलिसांनी अकोलखेड-मोहाळा मार्गावरील खर्डा परिसरात सापळा रचला.

यावेळी पोलिसांनी पाहणी केली असता, संशयित बोलेरो पिकअपमधून गोवंश जनावरे उतरवली जात असल्याचे आढळले. पोलिसांना पाहताच चालक घटनास्थळावरून फरार झाला. मात्र, पोलिसांनी तत्परता दाखवत शेख मुस्ताक शेख मुक्तार (वय २५, रा. मोहाळा) याला घटनास्थळी पकडले.

चौकशीदरम्यान आरोपीने ही जनावरे अब्दुल आरिफ अब्दुल गफार (रा. नंदीपेठ, अकोट) याची असल्याचे सांगितले. पोलिसांनी घटनास्थळावरून ४० किलो गोमांस, कत्तलीसाठी वापरण्यात येणारी शस्त्रे, तसेच ५ गोवंश जातीचे बैल जप्त केले.

याशिवाय, बोलेरो पिकअप (एमएच ३० एबी ४१७३) देखील जप्त करण्यात आली. एकूण ५ लाखांहून अधिक किमतीचा मुद्देमाल पोलिसांच्या ताब्यात घेण्यात आला आहे.

या प्रकरणी आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक अर्चित चांडक, अपर पोलीस अधीक्षक बी. चंद्रकांत रेड्डी आणि सहाय्यक पोलीस अधीक्षक निखील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली, अकोट ग्रामीण पोलीस स्टेशनचे ठाणेदार किशोर जुनघरे यांच्या पथकाने केली.

या धाडसी कारवाईमुळे अकोट परिसरात सुरू असलेल्या गोवंश तस्करीच्या जाळ्यावर मोठा आघात बसल्याचे मानले जात आहे.

Related Article

दुष्काळाचा बाजारपेठेला फटका! अकोल्यात डाळींच्या किमतीत १० ते १५ टक्क्यांनी वाढ; तांदळाचे दरही गगनाला

संगीता कुशवाह मृत्यू प्रकरण: सासरच्या तिघांचा अटकपूर्व जामीन फेटाळला; सरकारी वकिलांचा युक्तिवाद ठरला महत्त्वाचा

दुचाकी-ट्रकची जोरदार धडक; २२ वर्षीय युवक गंभीर जखमी, प्राथमिक उपचारानंतर अकोल्यातील सर्वोपचार रुग्णालयात हलविले

अकोला जिल्ह्यात दुष्काळी पंचनाम्यांना वेग; आतापर्यंत 1.85 लाख शेतकऱ्यांच्या 3.06 लाख हेक्टर क्षेत्राचे पंचनामे

महिला सक्षमीकरणाला बाळापूर नगरपालिकेची चालना; १०० महिलांना शिलाई प्रशिक्षणाची प्रमाणपत्रे

पातूरमध्ये शाळेतील प्रवेशासाठी १० ते १५ हजार रुपयांची मागणी? खासगी शाळांवर पालकांचे गंभीर आरोप

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!