Ads

खडकी-कौलखेड हल्ल्यांचा पर्दाफाश! ५ आरोपी जेरबंद

By Nilesh Sir

April 5, 2026 12:03 pm

Ads

अकोला शहरातील खदान पोलीस स्टेशन हद्दीत खडकी आणि कौलखेड परिसरात घडलेल्या मारहाण व जीवघेण्या हल्ल्यांच्या तीन गंभीर घटनांचा पोलिसांनी वेगाने उलगडा केला आहे. या प्रकरणात स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त माहितीच्या आधारे ५ आरोपींना अटक केली असून त्यांच्या ताब्यातील ३ मोटारसायकली जप्त करण्यात आल्या आहेत.

दिनांक ०४ एप्रिल २०२६ रोजी घडलेल्या या घटनांनंतर गुन्हा क्रमांक ८५५/२०२६, ८५६/२०२६ आणि ८५७/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता (BNS) अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले होते. प्रकरणाची गंभीरता लक्षात घेऊन SDPO पथक, खदान पोलीस पथक आणि स्थानिक गुन्हे शाखेचे विशेष पथक तयार करण्यात आले होते.

तपासादरम्यान आरोपी बार्शीटाकळी तालुक्यातील खडकी शेतशिवार परिसरात लपून बसल्याची माहिती मिळाली. त्यानुसार LCB पथकाने सापळा रचत ०५ एप्रिल रोजी सर्व आरोपींना ताब्यात घेतले. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये कबीर बलखंडे (१८), धनंजय ढाले (१९), शिवम उर्फ शुभम शेळके (१९), गौरव चव्हाण (२०) आणि एक विधी संघर्षग्रस्त बालकाचा समावेश आहे. काही आरोपींवर यापूर्वीही गुन्हे दाखल असल्याचे समोर आले आहे.

प्राथमिक चौकशीत जुन्या आपसी वादातून हे हल्ले केल्याचे आरोपींनी कबूल केले आहे. पुढील तपासासाठी आरोपींना खदान पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले असून तपास सुरू आहे.

विशेष म्हणजे, अल्पवयीन आरोपीवरही गंभीर गुन्ह्यांमुळे JJ अॅक्टनुसार प्रौढ म्हणून खटला चालवण्याची मागणी न्यायालयात करण्यात येणार आहे.

ही धडक कारवाई पोलीस अधीक्षक अर्चित चांडक, अपर पोलीस अधीक्षक बी. चंद्रकांत रेड्डी आणि SDPO सुदर्शन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विविध पथकांनी संयुक्तरीत्या पार पाडली. या कारवाईमुळे शहरातील गुन्हेगारीला मोठा आळा बसणार असल्याचे मानले जात आहे.

Related Article

दुष्काळाचा बाजारपेठेला फटका! अकोल्यात डाळींच्या किमतीत १० ते १५ टक्क्यांनी वाढ; तांदळाचे दरही गगनाला

संगीता कुशवाह मृत्यू प्रकरण: सासरच्या तिघांचा अटकपूर्व जामीन फेटाळला; सरकारी वकिलांचा युक्तिवाद ठरला महत्त्वाचा

दुचाकी-ट्रकची जोरदार धडक; २२ वर्षीय युवक गंभीर जखमी, प्राथमिक उपचारानंतर अकोल्यातील सर्वोपचार रुग्णालयात हलविले

अकोला जिल्ह्यात दुष्काळी पंचनाम्यांना वेग; आतापर्यंत 1.85 लाख शेतकऱ्यांच्या 3.06 लाख हेक्टर क्षेत्राचे पंचनामे

महिला सक्षमीकरणाला बाळापूर नगरपालिकेची चालना; १०० महिलांना शिलाई प्रशिक्षणाची प्रमाणपत्रे

पातूरमध्ये शाळेतील प्रवेशासाठी १० ते १५ हजार रुपयांची मागणी? खासगी शाळांवर पालकांचे गंभीर आरोप

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!