Ads

अकोल्यात मुलगी पळवणारा अखेर जेरबंद! महिन्यांच्या शोधानंतर अकोला पोलिसांची मोठी कारवाई;

By Nilesh Sir

April 4, 2026 2:22 pm

Ads

अकोला: जुने शहर पोलीस स्टेशन हद्दीतून अल्पवयीन मुलगी फुस लावून पळवून नेल्याच्या प्रकरणात पोलिसांनी मोठी कारवाई करत आरोपीला अखेर अटक केली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली होती, मात्र पोलिसांच्या सातत्यपूर्ण तपासामुळे आरोपीला जेरबंद करण्यात यश आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गाडगे नगर, जुने शहर अकोला येथील एका महिलेने 21 डिसेंबर 2025 रोजी पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली होती. फिर्यादीच्या मुलीला रात्री साडेआठ वाजताच्या सुमारास कोणीतरी फुस लावून पळवून नेल्याची तक्रार करण्यात आली होती. या प्रकरणी पोलीस स्टेशन जुने शहर येथे गुन्हा क्रमांक 792/2026 अन्वये भारतीय न्याय संहितेच्या कलम 137(2) अंतर्गत गुन्हा नोंदवून तपास सुरू करण्यात आला.

तपासादरम्यान पोलिसांना माहिती मिळाली की, संबंधित मुलगी राहुल राष्ट्रपाल वाकोडे (वय 25 वर्षे, रा. चिंचोली, ता. बाळापूर, जि. अकोला) याच्याशी फोनवर संपर्कात होती. यानुसार पोलिसांनी तपासाची दिशा बदलत आरोपीचा शोध सुरू केला. मात्र आरोपी वारंवार आपले ठिकाण बदलत असल्यामुळे तो पोलिसांच्या हाती लागत नव्हता.

पोलिसांनी गुप्त बातमीदारांच्या मदतीने आरोपीचा मागोवा घेत पुणे आणि मुंबई येथे शोध मोहीम राबवली. तरीही आरोपी मिळून आला नाही. अखेर 3 एप्रिल 2026 रोजी आरोपी बाळापूर तालुक्यातील तामग्री गावात असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तत्काळ कारवाई करत त्याला ताब्यात घेतले आणि अटक केली.

ही कारवाई पोलीस अधीक्षक अर्चित चांडक, अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत रेड्डी आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सुर्शन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. तसेच पोलीस निरीक्षक नितीन लेव्हरकर, तपास अधिकारी सुनील कोडापे व इतर पोलिस कर्मचाऱ्यांनी या कारवाईत महत्त्वाची भूमिका बजावली.

या घटनेमुळे मुलींच्या सुरक्षेबाबत पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित झाला असून पालकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात येत आहे. पोलिसांचा पुढील तपास सुरू आहे.


Related Article

दुष्काळाचा बाजारपेठेला फटका! अकोल्यात डाळींच्या किमतीत १० ते १५ टक्क्यांनी वाढ; तांदळाचे दरही गगनाला

संगीता कुशवाह मृत्यू प्रकरण: सासरच्या तिघांचा अटकपूर्व जामीन फेटाळला; सरकारी वकिलांचा युक्तिवाद ठरला महत्त्वाचा

दुचाकी-ट्रकची जोरदार धडक; २२ वर्षीय युवक गंभीर जखमी, प्राथमिक उपचारानंतर अकोल्यातील सर्वोपचार रुग्णालयात हलविले

अकोला जिल्ह्यात दुष्काळी पंचनाम्यांना वेग; आतापर्यंत 1.85 लाख शेतकऱ्यांच्या 3.06 लाख हेक्टर क्षेत्राचे पंचनामे

महिला सक्षमीकरणाला बाळापूर नगरपालिकेची चालना; १०० महिलांना शिलाई प्रशिक्षणाची प्रमाणपत्रे

पातूरमध्ये शाळेतील प्रवेशासाठी १० ते १५ हजार रुपयांची मागणी? खासगी शाळांवर पालकांचे गंभीर आरोप

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!