Ads

----

महसूल विभागाचा काळा खेळ? विटभट्टीत कोट्यवधींचा घोटाळा

By Nilesh Sir

April 1, 2026 10:13 am

Ads

अकोट तालुक्यातील चोहोट्टा बाजार परिसरात महसूल विभागाचा कारभार पूर्णपणे संशयाच्या भोवऱ्यात सापडला आहे. “कोट्यवधींचा महसूल… पण सरकारी तिजोरीत किती?” हा प्रश्न आता केवळ चर्चा नसून संतप्त नागरिकांचा थेट आरोप बनला आहे.

मार्च एंडिंग संपले तरी काही विटभट्टी सर्व्हे अपूर्णच आहे. नियमांनुसार कारवाई होणे अपेक्षित असताना महसूल विभाग मात्र शांत का? “नेमकं चाललंय काय महसूल विभागात?” असा थेट सवाल उपस्थित केला जात आहे.

तहसीलदारांनी ३१ मार्चपर्यंत रॉयल्टी भरण्याचे आदेश दिले, मात्र अनेकांनी आजतागायत भरणा केलेला नाही. तरीही कारवाईचा पत्ता नाही. यावरून प्रशासनाचा ढिसाळपणा की जाणीवपूर्वक दुर्लक्ष, असा संशय बळावत आहे.

याहून गंभीर म्हणजे, रामा नावाच्या दलालासह काही अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या संगनमताने आर्थिक व्यवहार झाल्याची चर्चा उघडपणे होत आहे. हजारो ब्रास माती कमी दाखवून शासनाचा महसूल बुडवला जात असल्याचे आरोप होत आहेत.

“सर्वेमध्ये खेळ… महसूल कुठे गेला?” हा प्रश्न आता केवळ नागरिकांचाच नाही, तर संपूर्ण व्यवस्थेच्या पारदर्शकतेवरच बोट ठेवणारा ठरतो आहे.

जर हे सर्व खरे असेल, तर हा केवळ निष्काळजीपणा नसून सरळसरळ शासनाच्या तिजोरीवर डल्ला असल्याचे चित्र समोर येत आहे.

आता जिल्हाधिकाऱ्यांनी तात्काळ चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार का, की हा प्रकार पुन्हा दाबला जाणार, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!