Ads

“आज जनावरे… उद्या माणूस?” अकोला न्यूज नेटवर्क चे खरी ठरली! तेल्हारा तालुक्यात वाघाच्या हल्ल्यात शेतकऱ्याचा मृत्यू

By Nilesh Sir

March 16, 2026 9:01 pm

Ads

अकोला जिल्ह्यातील तेल्हारा तालुक्यातील झरी बाजार येथे बारूखेडा वर्तुळ मध्ये वाघाच्या हल्ल्यात गुलजार फत्तु महल्ले यांचा जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गुलजार फत्तु महल्ले हे झरी बाजार बारूखेडा वर्तुळ जंगल परिसरातुन जनावरे घेऊन घरी येत असताना अचानक दोन वाघाने त्यांच्यावर हल्ला केला. हा हल्ला इतका भीषण होता की त्यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच वन विभागाने धाव घेतली असून पुढील तपास सुरु आहे.

दरम्यान काही दिवसांपूर्वी अकोला न्यूज नेटवर्कने अकोट तालुक्यातील हिवरखेड नजीकच्या सौंदळा शिवारात पट्टेदार वाघाच्या हल्ल्याची बातमी “आज जनावरे… उद्या माणूस?” या शीर्षकाखाली प्रकाशित केली होती. त्या घटनेत अनेक जनावरांचा बळी गेला होता आणि नागरिकांनी वन विभागाला तातडीने कारवाई करण्याची मागणी केली होती.

मात्र त्यानंतरही ठोस उपाययोजना न झाल्याने आता वाघाच्या हल्ल्यात एका व्यक्तीचा बळी गेल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.

परिसरातील ग्रामस्थांनी वन विभागाने तात्काळ पथक पाठवून वाघाचा बंदोबस्त करावा, अन्यथा आणखी जीवितहानी होण्याची भीती व्यक्त केली आहे. आता या घटनेनंतर तरी वन विभाग जागा होणार का? असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

वृत्त लिहीपर्यंत माहिती प्राप्त सविस्तर…..

Related Article

Supreme Court: वाहतूक नियम मोडलात तर थेट वीज बिलातच येणार दंडाची रक्कम; सर्वोच्च न्यायालयाचे सरकारला निर्देश

आदर्श गोरक्षण संस्थेतून १२ वर्षीय मुलगी बेपत्ता; लोणारमध्ये सुरक्षित सापडली

अकोला सत्र न्यायालयाकडून व्यावसायिक इरशाद खान यांना अटकपूर्व जामीन; कॉपीराइट प्रकरणात अँडव्होकेट शिवम शर्मा यांचा युक्तिवाद महत्त्वाचा

ट्रकच्या संपूर्ण नुकसानीप्रकरणी विमा कंपनीला ग्राहक आयोगाचा दणका; २५.७९ लाख रुपये ६ टक्के व्याजासह देण्याचा आदेश

बेडरूममध्ये छुपा कॅमेरा बसवून महिलेचे खासगी व्हिडीओ केल्याचा आरोप; कारपेंटरचा जामीन अर्ज फेटाळला

उमरा फाट्याजवळ काळाचा घाला! ट्रॅक्टर ट्रॉली पलटी; एका मजुराचा मृत्यू, ५ गंभीर जखमी

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!