Ads

अकोल्यात लाचखोरीचा पर्दाफाश! अवैध दारू विक्रीसाठी ३ हजारांची मागणी;

By Nilesh Sir

March 13, 2026 4:20 pm

Ads

अकोला जिल्ह्यात लाचखोरीचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) दोन पोलीस कर्मचाऱ्यांना ताब्यात घेतले आहे. अवैध दारू विक्री सुरू ठेवण्यासाठी पैशांची मागणी केल्याचा आरोप संबंधित पोलिसांवर करण्यात आला आहे. या कारवाईमुळे पोलीस विभागात एकच खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मूर्तिजापूर ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ग्राम अनभोरा येथे हा प्रकार घडला. येथे अवैध दारू विक्री सुरू ठेवण्यासाठी संबंधित बीट जमादार कानडे आणि रायटर ज्ञानेश्वर रडके यांनी तक्रारदाराकडे तीन हजार रुपयांची लाच मागितल्याचा आरोप आहे.

या संदर्भात तक्रारदाराने अकोला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली होती. एसीबी पथकाने तक्रारीची पडताळणी केली असता दोन्ही कर्मचाऱ्यांनी तीन हजार रुपयांची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. दरम्यान नंतर हा व्यवहार दोन हजार रुपयांवर ठरल्याची माहिती समोर आली.

एसीबी पथक आरोपींना रंगेहात पकडण्याच्या तयारीत असताना कारवाईची चाहूल लागल्याने संबंधित आरोपी पैसे स्वीकारण्यास टाळाटाळ करत असल्याचे दिसून आले. यानंतर एसीबीचे पोलीस उपअधीक्षक मिलिंद बाहकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक इंगळे यांच्या पथकाने कारवाई करत दोन्ही कर्मचाऱ्यांना ताब्यात घेतले.

या कारवाईमुळे पोलीस विभागात खळबळ उडाली असून या प्रकरणाचा पुढील तपास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून सुरू आहे.

Related Article

Supreme Court: वाहतूक नियम मोडलात तर थेट वीज बिलातच येणार दंडाची रक्कम; सर्वोच्च न्यायालयाचे सरकारला निर्देश

आदर्श गोरक्षण संस्थेतून १२ वर्षीय मुलगी बेपत्ता; लोणारमध्ये सुरक्षित सापडली

अकोला सत्र न्यायालयाकडून व्यावसायिक इरशाद खान यांना अटकपूर्व जामीन; कॉपीराइट प्रकरणात अँडव्होकेट शिवम शर्मा यांचा युक्तिवाद महत्त्वाचा

ट्रकच्या संपूर्ण नुकसानीप्रकरणी विमा कंपनीला ग्राहक आयोगाचा दणका; २५.७९ लाख रुपये ६ टक्के व्याजासह देण्याचा आदेश

बेडरूममध्ये छुपा कॅमेरा बसवून महिलेचे खासगी व्हिडीओ केल्याचा आरोप; कारपेंटरचा जामीन अर्ज फेटाळला

उमरा फाट्याजवळ काळाचा घाला! ट्रॅक्टर ट्रॉली पलटी; एका मजुराचा मृत्यू, ५ गंभीर जखमी

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!