Ads

---

शहर हादरलं! दोन महिन्यांपासून बेपत्ता असलेल्या व्यक्तीचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह सांडपाण्याच्या गटारात सापडला

By Nilesh Sir

February 15, 2026 9:29 am

Ads

शहरातील ५२ गेट परिसरात एक धक्कादायक घटना समोर आली असून गेल्या दोन महिन्यांपासून बेपत्ता असलेले संजय तुळशीराम कोकाटे (वय ५५) यांचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. गाडेकर लेआऊट लगत असलेल्या मोकळ्या जागेतील सांडपाण्याच्या गटारात हा मृतदेह आढळून आला.

मिळालेल्या माहितीनुसार, गाडेकर लेआऊट परिसरातील एका रहिवाशाला साफसफाई करत असताना तीव्र दुर्गंधी जाणवली. संशय आल्याने त्यांनी आजूबाजूला पाहणी केली असता गटारात कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह दिसून आला. घटनेची गंभीरता लक्षात घेत त्यांनी तात्काळ पोलिसांना माहिती दिली.

माहिती मिळताच मूर्तिजापूर शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला. प्राथमिक तपासात हा मृतदेह संजय तुळशीराम कोकाटे यांचाच असल्याचे स्पष्ट झाले. ते मागील दोन महिन्यांपासून बेपत्ता असल्याची नोंद पोलिस ठाण्यात होती.

दरम्यान, मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून घातपाताचा संशय आहे का, यासह सर्व शक्यतांचा तपास पोलिसांकडून केला जात आहे. ठाणेदार अजित जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू असून या घटनेमुळे शहरात भीती व चर्चेचे वातावरण निर्माण झाले आहे.

Related Article

दुष्काळाचा बाजारपेठेला फटका! अकोल्यात डाळींच्या किमतीत १० ते १५ टक्क्यांनी वाढ; तांदळाचे दरही गगनाला

संगीता कुशवाह मृत्यू प्रकरण: सासरच्या तिघांचा अटकपूर्व जामीन फेटाळला; सरकारी वकिलांचा युक्तिवाद ठरला महत्त्वाचा

दुचाकी-ट्रकची जोरदार धडक; २२ वर्षीय युवक गंभीर जखमी, प्राथमिक उपचारानंतर अकोल्यातील सर्वोपचार रुग्णालयात हलविले

अकोला जिल्ह्यात दुष्काळी पंचनाम्यांना वेग; आतापर्यंत 1.85 लाख शेतकऱ्यांच्या 3.06 लाख हेक्टर क्षेत्राचे पंचनामे

महिला सक्षमीकरणाला बाळापूर नगरपालिकेची चालना; १०० महिलांना शिलाई प्रशिक्षणाची प्रमाणपत्रे

पातूरमध्ये शाळेतील प्रवेशासाठी १० ते १५ हजार रुपयांची मागणी? खासगी शाळांवर पालकांचे गंभीर आरोप

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!