Ads

---

शरद पवारांची प्रकृती बिघडली; पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकमध्ये दाखल, डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरू

By Nilesh Sir

February 9, 2026 5:26 pm

Ads

राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट)चे अध्यक्ष शरद पवार यांची प्रकृती अचानक बिघडल्याने त्यांना बारामतीहून तातडीने पुण्यातील रुबी हॉल क्लिनिक, पुणे येथे दाखल करण्यात आले आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांना खोकला, घसा खवखवणे, ताप तसेच श्वास घेण्यास त्रास जाणवत होता.


सकाळपासून त्रास वाढल्याने रुग्णालयात हलवले
आज सकाळी प्रकृतीत अधिक बिघाड जाणवल्याने डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांना तातडीने रुग्णालयात हलवण्याचा निर्णय घेण्यात आला. बारामती येथील गोविंदबाग निवासस्थानावरून कार्डियाक अॅम्ब्युलन्ससह त्यांचा ताफा पुण्याकडे रवाना झाला.
रुग्णालयात दाखल झाल्यानंतर रुबी हॉल क्लिनिकचे प्रमुख डॉ. परवेझ ग्रँट यांच्या देखरेखीखाली त्यांची सखोल वैद्यकीय तपासणी सुरू करण्यात आली आहे.


ऍडमिट करायचे की घरी सोडायचे?

निर्णय तपासणीनंतर डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, प्राथमिक तपासणीनंतर त्यांना रुग्णालयात ऍडमिट ठेवायचे की उपचार करून घरी सोडायचे याबाबत निर्णय घेतला जाणार आहे. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत असून, ते डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली आहेत.


कुटुंबीय रुग्णालयात उपस्थित
यावेळी त्यांच्या कन्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह कुटुंबीय रुग्णालयात उपस्थित असून, वैद्यकीय टीमकडून सातत्याने प्रकृतीची माहिती घेत आहेत.


दौऱ्यांमुळे वाढला थकवा?
गेल्या काही दिवसांत दिवंगत नेते अजित पवार यांच्या निधनानंतर शरद पवार हे बारामती, मुंबई आणि पुणे येथे सतत दौरे करत होते. पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी वाढल्याने त्यांना प्रचंड थकवा आला होता. त्यामुळेच आजारपण वाढल्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली आहे.

Related Article

अकोल्यातील न्यू तापडिया नगर रेल्वे गेट लवकरच सुरू होणार? उड्डाणपूल जानेवारीअखेर खुला करण्याचे निर्देश

दुष्काळाचा बाजारपेठेला फटका! अकोल्यात डाळींच्या किमतीत १० ते १५ टक्क्यांनी वाढ; तांदळाचे दरही गगनाला

संगीता कुशवाह मृत्यू प्रकरण: सासरच्या तिघांचा अटकपूर्व जामीन फेटाळला; सरकारी वकिलांचा युक्तिवाद ठरला महत्त्वाचा

दुचाकी-ट्रकची जोरदार धडक; २२ वर्षीय युवक गंभीर जखमी, प्राथमिक उपचारानंतर अकोल्यातील सर्वोपचार रुग्णालयात हलविले

अकोला जिल्ह्यात दुष्काळी पंचनाम्यांना वेग; आतापर्यंत 1.85 लाख शेतकऱ्यांच्या 3.06 लाख हेक्टर क्षेत्राचे पंचनामे

महिला सक्षमीकरणाला बाळापूर नगरपालिकेची चालना; १०० महिलांना शिलाई प्रशिक्षणाची प्रमाणपत्रे

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!