Ads

---

शिरुर पंचायत समिती निवडणुकीत धक्का! सोशल मीडियाची स्टार निर्मला नवले यांचा ३०० मतांनी पराभव

By Nilesh Sir

February 9, 2026 2:40 pm

Ads

सोशल मीडियावर प्रचंड फॅन फॉलोअिंग असलेल्या यांना यंदाच्या पंचायत समिती निवडणुकीत अनपेक्षित पराभवाचा धक्का बसला आहे. (ता. शिरुर, जि. पुणे) येथील माजी सरपंच असलेल्या नवले या पक्षाकडून अंतर्गत कारेगाव – कान्हूर मेसाई गणातून निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या होत्या.

मात्र, या वेळी मतदारांनी वेगळा कौल दिल्याने नवले यांची जादू चालू शकली नाही. भाजपच्या उमेदवार यांनी त्यांचा तब्बल ३०० मतांनी पराभव केला. हा निकाल नवले आणि त्यांच्या समर्थकांसाठी मोठा धक्का मानला जात आहे.

निर्मला नवले या पुणे जिल्ह्यातील स्थानिक राजकारणात सक्रिय चेहरा म्हणून ओळखल्या जातात. माजी सरपंच म्हणून काम करताना त्यांनी विविध स्थानिक प्रश्नांवर भूमिका घेतली होती. त्याचबरोबर सोशल मीडियावर व्हिडिओ, जनसंपर्क मोहिमा आणि स्थानिक मुद्द्यांवरील भाष्यामुळे त्यांची वेगळी ओळख निर्माण झाली होती.

या पार्श्वभूमीवर त्यांच्या पराभवाची चर्चा राजकीय वर्तुळासह सोशल मीडियावरही रंगली आहे. ग्रामीण भागात सोशल मीडिया लोकप्रियता आणि प्रत्यक्ष मतदानातील गणित यामधील तफावत पुन्हा एकदा स्पष्ट झाल्याची प्रतिक्रिया राजकीय जाणकारांकडून व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, शिरुर तालुक्यातील पंचायत समिती निवडणुकीचे इतर निकालही हळूहळू समोर येत असून स्थानिक राजकारणात नव्या समीकरणांची चर्चा सुरू झाली आहे.

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!