Ads

--

मेळघाट हादरलं; सिकलसेल रुग्णाचा शिबिरातच मृत्यू,

By Nilesh Sir

February 7, 2026 5:52 pm

Ads

आरोग्य यंत्रणा सिकलसेलविरोधात मोहिमा राबवत असताना मेळघाटातून एक धक्कादायक व हृदयद्रावक घटना समोर आली आहे. चिखलदऱ्याच्या ग्रामीण रुग्णालयात आयोजित सिकलसेल तपासणी व उपचार शिबिरात उपचारासाठी आलेल्या महिलेचा अचानक मृत्यू झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.

प्राप्त माहितीनुसार, चिखली (ता. चिखलदरा) येथील द्रौपदी सुरेश पटोरकर (वय ४२) या शुक्रवारी आयोजित आरोग्य शिबिरात उपचारासाठी आल्या होत्या. आरोग्य विभागामार्फत त्यांच्यावर मागील चार ते पाच वर्षांपासून सिकलसेल आजाराचे उपचार सुरू होते. प्रकृती बिघडल्याने त्या तपासणीसाठी शिबिरात दाखल झाल्या.

मात्र शिबिरात पोहोचताच अचानक त्यांना तीव्र रक्ताच्या उलट्या सुरू झाल्या. उपस्थित वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी तत्काळ मदत करण्याचा प्रयत्न केला; परंतु काही क्षणांतच त्यांची प्राणज्योत मालवली. उपचारासाठी आलेल्या रुग्णाचा शिबिरातच मृत्यू झाल्याने नातेवाईकांसह उपस्थितांमध्ये एकच खळबळ उडाली.

मेळघाट परिसरात सिकलसेल आजाराने अक्षरशः थैमान घातले असून आदिवासी भागात या आजाराचे प्रमाण चिंताजनकरीत्या वाढत आहे. अनेक रुग्णांवर सातत्याने उपचार सुरू असले तरी आरोग्य सुविधांची मर्यादा, उशिरा निदान आणि पोषणअभावी परिस्थिती गंभीर बनत असल्याचे चित्र आहे.

द्रौपदी पटोरकर यांच्या मृत्यूने सिकलसेल आजाराच्या भीषणतेकडे पुन्हा लक्ष वेधले आहे. मेळघाटात विशेष आरोग्य मोहीम, नियमित तपासणी, तातडी उपचार सुविधा व जनजागृती वाढविण्याची गरज अधोरेखित होत आहे.

दरम्यान, या घटनेनंतर आरोग्य विभागाने प्राथमिक माहिती देत उपचार सुरू असल्याचे स्पष्ट केले असून मृत्यूचे नेमके कारण वैद्यकीय अहवालानंतर स्पष्ट होणार असल्याचे सांगण्यात आले.

मेळघाटातील सिकलसेलचे वाढते सावट आणि आरोग्य यंत्रणेची झुंज — या दुर्दैवी घटनेने पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उभे केले आहे.

Related Article

अकोल्यातील न्यू तापडिया नगर रेल्वे गेट लवकरच सुरू होणार? उड्डाणपूल जानेवारीअखेर खुला करण्याचे निर्देश

दुष्काळाचा बाजारपेठेला फटका! अकोल्यात डाळींच्या किमतीत १० ते १५ टक्क्यांनी वाढ; तांदळाचे दरही गगनाला

संगीता कुशवाह मृत्यू प्रकरण: सासरच्या तिघांचा अटकपूर्व जामीन फेटाळला; सरकारी वकिलांचा युक्तिवाद ठरला महत्त्वाचा

दुचाकी-ट्रकची जोरदार धडक; २२ वर्षीय युवक गंभीर जखमी, प्राथमिक उपचारानंतर अकोल्यातील सर्वोपचार रुग्णालयात हलविले

अकोला जिल्ह्यात दुष्काळी पंचनाम्यांना वेग; आतापर्यंत 1.85 लाख शेतकऱ्यांच्या 3.06 लाख हेक्टर क्षेत्राचे पंचनामे

महिला सक्षमीकरणाला बाळापूर नगरपालिकेची चालना; १०० महिलांना शिलाई प्रशिक्षणाची प्रमाणपत्रे

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!