Ads

----

अकोल्यात ‘बुलडोझर अ‍ॅक्शन’! बलात्कार प्रकरणातील आरोपींच्या दुकानावर महानगरपालिकेची तातडीची कारवाई

By Nilesh Sir

February 4, 2026 7:45 pm

Ads

शहरात घडलेल्या धक्कादायक बलात्कार प्रकरणानंतर प्रशासन आक्रमक भूमिकेत उतरल्याचं स्पष्ट दिसून आलं आहे. प्रशासनाच्या तोडक पथकाने सिटी कोतवाली पोलीस ठाण्याच्या मागील गांधी रोड परिसरात बुलडोझर चालवत अवैध अतिक्रमणावर थेट कारवाई केली. विशेष म्हणजे ही कारवाई बलात्कार प्रकरणातील आरोपींच्या दुकानांवर झाल्याने शहरात गुन्हेगारांविरोधात कठोर संदेश गेला आहे.

डाबकी रोड परिसरातील एका विवाहित महिलेने दोन दिवसांपूर्वी येथे गंभीर तक्रार दाखल केली होती. तक्रारीनुसार आरोपींनी अश्लील व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत पीडितेवर अत्याचार केले. या प्रकरणात रहमान ऊर्फ मोहम्मद मुस्तफा सलीम तेली, मोहम्मद इब्राहिम ऊर्फ बाबू सलीम तेली, इब्राहिम (गॅरेजवाला) आणि चंदू वानखेडे यांच्यावर बलात्कारासह गंभीर कलमांखाली गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

पीडितेच्या म्हणण्यानुसार गांधी रोडवरील ‘परी बिंदी घर’ या दुकानात ही घटना घडली. याच ठिकाणी अश्लील चित्रीकरण करून दबाव टाकत जबरदस्ती करण्यात आल्याचा आरोप आहे. सध्या दोन आरोपींना अटक करण्यात आली असून उर्वरित आरोपींचा शोध सुरू आहे.

दरम्यान, कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी आणि सामाजिक तेढ निर्माण होऊ नये यासाठी प्रशासनाने तत्काळ पावले उचलली. ‘परी बिंदी घर’सह लगतच्या अवैध दुकानांवर बुलडोझर कारवाई करत अतिक्रमण हटवण्यात आले. महानगरपालिकेने ही कारवाई अवैध बांधकामांविरोधात असल्याचं स्पष्ट केलं असलं तरी गुन्हेगारी प्रवृत्तीविरोधात हा ठोस इशारा मानला जात आहे.

स्थानिक नागरिकांनी या कारवाईचं स्वागत केलं असून, अकोल्यात गुन्हेगारांविरोधात कडक धोरण राबवलं जात असल्याची चर्चा रंगली आहे. सिटी कोतवाली पोलीस संपूर्ण प्रकरणाचा सखोल तपास करत असून पुढील कारवाई लवकरच होण्याची शक्यता आहे.

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!