Ads

---

ब्रेकिंग अकोला: एनएच-53 वर भीषण अपघात! भरधाव दुचाकी डिव्हायडरवर आदळली, चालक गंभीर

By Nilesh Sir

February 4, 2026 10:59 am

Ads

मुर्तिजापूर तालुक्यातील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 53 वर हेंडज गावाजवळ मंगळवारी (3 फेब्रुवारी) रात्रीच्या सुमारास भरधाव दुचाकीचा भीषण अपघात झाला. दुचाकी क्रमांक MH 27 AN 9802 ही वेगाच्या भरात नियंत्रण सुटल्याने थेट डिव्हायडरवर आदळली. या धडकेत चालक रस्त्यावर फेकला गेला. विशेष म्हणजे हेल्मेट न घातल्यामुळे डोक्याला गंभीर दुखापत झाली असून त्याची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे.

अपघातग्रस्त चालक हा लोणी येथील रहिवासी असल्याचे समजते. रक्तबंबाळ अवस्थेत पडलेल्या चालकाला पाहताच स्थानिक नागरिकांनी तत्काळ मदतकार्य सुरू केले. जय गजानन आपत्कालीन पथक यांनी प्रसंगावधान राखत जखमीला तात्काळ मुर्तिजापूर येथील श्रीमती लक्ष्मीबाई उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र जखमा गंभीर असल्याने प्राथमिक उपचारानंतर त्याला पुढील उपचारासाठी अकोला येथे रेफर करण्यात आले आहे.

या घटनेनंतर पुन्हा एकदा वेगमर्यादेचे उल्लंघन, हेल्मेटविना वाहनचालकांची बेफिकिरी आणि वाहतूक नियमांकडे दुर्लक्ष हे मुद्दे ऐरणीवर आले आहेत. नागरिकांकडून “हेल्मेट नाही म्हणजे थेट मृत्यूला आमंत्रण” अशी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त होत असून, पोलिसांनी महामार्गावरील तपासणी आणि जनजागृती मोहीम अधिक कडक करण्याची मागणी केली जात आहे.

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!