Ads

---

आपत्ती व्यवस्थापनात मोलाची कामगिरी! वीर एकलव्य शोध व बचाव पथकाला जिल्हाधिकारी कार्यालयाकडून प्रमाणपत्र प्रदान

By Nilesh Sir

January 26, 2026 10:12 am

Ads

अकोला जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून वीर एकलव्य आपत्कालिन शोध व बचाव पथक, पोपटखेड (ता. अकोट) यांना उल्लेखनीय कार्यासाठी सन्मानित करण्यात आले आहे. मान्सून कालावधी २०२५ दरम्यान विविध शोध व बचाव मोहिमा, आपत्कालीन परिस्थितीतील मदतकार्य तसेच कावड यात्रा, गणपती विसर्जन बंदोबस्त आणि इतर सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये या पथकाने अतिशय महत्त्वाची भूमिका बजावली होती.

आपत्तीच्या काळात जीवितहानी टाळण्यासाठी तत्पर प्रतिसाद, नागरिकांचे सुरक्षित स्थलांतर, पाण्यात अडकलेल्यांचे रेस्क्यू, तसेच प्रशासनाला प्रत्यक्ष मदत करून या पथकाने आपली जबाबदारी पार पाडली. त्यांच्या कार्याची दखल घेत जिल्हा प्रशासनाने हे प्रमाणपत्र प्रदान करत समाजहितासाठी केलेल्या सेवेला अधिकृत मान्यता दिली आहे.

0-0x0-0-0#

या सन्मानामुळे संपूर्ण पोपटखेड परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून, युवकांमध्ये आपत्ती व्यवस्थापन व स्वयंसेवी सेवेकडे वळण्याची प्रेरणा मिळाली आहे. भविष्यातही अशाच प्रकारे संकटाच्या वेळी नागरिकांच्या मदतीसाठी पुढाकार घेण्याचा निर्धार पथकाने व्यक्त केला आहे.

वीर एकलव्य पथकाच्या या कामगिरीमुळे अकोला जिल्ह्यातील आपत्ती व्यवस्थापन व्यवस्थेला अधिक बळ मिळाले असून, प्रशासन आणि स्वयंसेवी पथकांच्या समन्वयातून प्रभावी बचावकार्य शक्य असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!