Ads

---

चोहोट्टा बाजारात ‘एक्का बादशाहा’ जुगारावर पोलिसांचा छापा, 6 जण ताब्यात, 36 हजारांचा मुद्देमाल जप्त

By Nilesh Sir

January 25, 2026 10:29 am

Ads

अकोट तालुक्यातील चोहोट्टा बाजार परिसरात सुरू असलेल्या अवैध जुगार अड्ड्यावर पोलिसांनी मोठी कारवाई करत ‘एक्का बादशाहा’ चार्टवर सुरू असलेला जुगार उध्वस्त केला आहे. या कारवाईत सहा जणांना ताब्यात घेण्यात आले असून तब्बल 36 हजार 660 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई शुक्रवार, 24 जानेवारी रोजी सायंकाळच्या सुमारास करण्यात आली.

मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय, अकोट यांच्या मार्गदर्शनाखाली दहीहांडा पोलीस ठाणे व चोहोट्टा बाजार चौकीच्या पथकाने संयुक्त कारवाई केली. जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या मागील बाजूस असलेल्या वडाच्या झाडाखाली सार्वजनिक ठिकाणी जुगार सुरू असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी पंचांसह घटनास्थळी धाड टाकली.

छाप्यात हर्षल रघुनाथ खेडकर (रा. चोहोट्टा बाजार) हा जुगार चालवत असल्याचे आढळून आले. त्याच्यासह जुगार खेळणारे ज्ञानेश्वर पिंपरे (कुटासा), बाळकृष्ण कोलटक्के (रेल), गोवर्धन वानखडे (कावसा), केशव नरवाडे (चोहोट्टा बाजार) आणि बाळकृष्ण मातुरकर (टाकळी) यांना ताब्यात घेण्यात आले. काही जण घटनास्थळावरून पळून जाण्यात यशस्वी झाले.

कारवाईदरम्यान रोख रक्कम, मोबाईल फोन, एक्का बादशाहा चार्ट, 52 पत्त्यांचा कळप असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सर्व आरोपींविरुद्ध महाराष्ट्र जुगार कायदा कलम 12 अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून पुढील तपास सुरू आहे.

या धडक कारवाईमुळे परिसरातील जुगार अड्ड्यांमध्ये खळबळ उडाली असून अवैध धंद्यांविरोधात पोलिसांचा कडक पवित्रा पुन्हा एकदा स्पष्ट झाला आहे.

Related Article

दुष्काळाचा बाजारपेठेला फटका! अकोल्यात डाळींच्या किमतीत १० ते १५ टक्क्यांनी वाढ; तांदळाचे दरही गगनाला

संगीता कुशवाह मृत्यू प्रकरण: सासरच्या तिघांचा अटकपूर्व जामीन फेटाळला; सरकारी वकिलांचा युक्तिवाद ठरला महत्त्वाचा

दुचाकी-ट्रकची जोरदार धडक; २२ वर्षीय युवक गंभीर जखमी, प्राथमिक उपचारानंतर अकोल्यातील सर्वोपचार रुग्णालयात हलविले

अकोला जिल्ह्यात दुष्काळी पंचनाम्यांना वेग; आतापर्यंत 1.85 लाख शेतकऱ्यांच्या 3.06 लाख हेक्टर क्षेत्राचे पंचनामे

महिला सक्षमीकरणाला बाळापूर नगरपालिकेची चालना; १०० महिलांना शिलाई प्रशिक्षणाची प्रमाणपत्रे

पातूरमध्ये शाळेतील प्रवेशासाठी १० ते १५ हजार रुपयांची मागणी? खासगी शाळांवर पालकांचे गंभीर आरोप

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!