Ads

---

निवडणूक संपताच बिबट्याचा पुन्हा ‘उदय’! दोन बिबट्यांचे दर्शन, शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण

By Nilesh Sir

January 19, 2026 4:46 am

Ads

निवडणुकीचा धुरळा खाली बसताच अकोला-बाळापूर तालुक्यात पुन्हा भीतीचं सावट पसरलं आहे… कालपर्यंत राजकीय चर्चेत गाजलेला बिबट्या आज थेट शेतात दिसू लागला असून दोन बिबट्यांच्या दर्शनामुळे शेतकरी आणि ग्रामस्थ धास्तावले आहेत!

अकोला जिल्ह्यात बिबट्याचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. विधानसभा अधिवेशनात बिबट्याच्या हल्ल्यांवर आणि वनविभागाच्या भूमिकेवर जोरदार चर्चा झाली होती. त्यानंतर महानगरपालिका निवडणुकीच्या काळात हा विषय जणू गायब झाल्यासारखा दिसत होता. मात्र, निवडणूक निकालानंतर पुन्हा एकदा बिबट्याने ‘डोके वर काढले’ असून अकोला-बाळापूर तालुक्यातील शेतकऱ्यांना दोन बिबट्यांचे दर्शन झाल्याची माहिती समोर आली आहे.

स्थानिक शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, पहाटेच्या सुमारास शेत परिसरात दोन बिबटे फिरताना दिसले. या घटनेनंतर नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, शेतात जाणे, जनावरे चारण्यासाठी बाहेर सोडणे आणि रात्रीच्या वेळेस गावाबाहेर जाणे धोकादायक ठरत असल्याची भावना व्यक्त होत आहे.

दरम्यान, बिबट्यांच्या हालचाली वाढल्यामुळे वनविभागाने सतर्कता वाढवावी, गस्त वाढवावी तसेच पिंजरे लावून बिबट्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे. विशेषतः शेतकरी आणि महिला-लहान मुलांच्या सुरक्षेबाबत चिंता व्यक्त केली जात आहे.

निवडणुकीच्या गदारोळात दुर्लक्षित राहिलेला हा गंभीर विषय आता पुन्हा समोर आला असून, प्रशासन आणि वनविभाग याकडे किती तत्काळ लक्ष देतात, याकडे संपूर्ण अकोला जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!