WhatsApp

Wife ends life of Husband अनैतिक प्रेम संबंधातून बायकोने दिराच्या मदतीने नवऱ्याला संपवले

अकोला न्यूज नेटवर्क ब्यूरो दिनांक १९ मार्च राहुल सोनोने प्रतिनिधी वडेगाव :- Wife ends life of Husband प्रेम हे आंधळ असत आपण नेहमीं एकत आलोय म्हणतात की प्रेमाला वयाची सीमा नसते पण हे वाचण्यास छान वाटत पण याची प्रचिती घेतो म्हतल तर भल्या भल्याच्या आयुष्याची राख रांगोळी होऊन संसार उघड्यावर पडतो अशीच काहीशी घटना वा पोलीस चौकीच्या हद्दीत घडली आणि या आंधळ्या प्रेमापायी तीन मुलाच्या डोक्यावरील छत्र कायमचे हरपून माय पासून देखील ही पोरं दुरवल्या गेली.

अकोला जिल्ह्यात बाळापूर तालुक्यात येत असलेल्या वाडेगाव जवळील तुलंगा खुर्द हे गाव ह्याच गावात ३५ वर्षीय प्रमोद जानकीराम मेसरे त्याची पत्नी २७ वर्षीय मंगला प्रमोद मेसरे दोन मुली आणि एक मुलगा असे राहत होते आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह करण्यासाठी प्रमोद हा विट भट्टिवर काम करीत होता पण म्हणतात ना गरिबी ही फार वाईट असते अगदी तसेच घडले देखील प्रमोद हा कामावर गेल्यावर त्याची पत्नी मंगला ही घरकाम करीत असे यातच प्रमोदचा चुलत भाऊ गोटु मेसरे याचे घरात येणे जाणे सुरू झाले आणि या सोन्यासारख्या परिवाराला नजर लागली हळूहळू मंगला व गोटु यांचे सुत जुळले आणि यांच्यात प्रमाची रासलीला रंगू लागली आपल्या प्रेमाच्या मधात आपला नवरा हा येत आल्याने दोघांनी देखील प्रमोदचा काटा काढायचा बेत रचला Wife ends life of Husband

Wife ends life of Husband
Wife ends life of Husband

सोमवार दिनांक १८ मार्च रोजी नियमांना प्रमाणे प्रमोद मेसरे हा आपल्या कामावरून घरी आला जिवन केल्यानंतर झोपण्यासाठी गेलेल्या प्रमोदला आपलीच बायको आणि आपला चुलत भाऊ हे कायमचे झोपवणार आहे याची पिलसटशी देखील कल्पना नव्हती रात्री प्रमोद हा झोपला असल्याचे पाहून मंगला प्रमोद मेसरे व तिचा प्रियकर तसेच प्रमोद याचा चुलत भाऊ गोटू मेसरे यांनी संधीचा फायदा घेऊन प्रमोद याचा गळा आवळून त्याची हत्या केली.

 सकाळी प्रमोद हा मृता अवस्थेत असल्याचे पाहून घरच्यांनी व गावकऱ्यांनी सदर बाब ही वाडेगाव पोलिसांना सांगितली घटनेची माहिती मिळताच वाडेगाव सहायक पोलिस निरीक्षक पंकज कांबळे हे घटनास्थळी पोहोचले अधिक तपास केला असता सहायक पोलिस निरीक्षक पंकज कांबळे यांच्या मनात शंकेची पाल चूकचुकली अधिक तपास केला असता ही हत्या असल्याची बाब पोलिसांच्या लक्षात येताच पोलिसांनी आपले चक्र फिरविण्यास सुरुवात केली आणि प्रमोद याची हत्या करून फरार झालेली मंगला मेसरे तसेच तिचा प्रियकर व प्रमोद याचा चुलत भाऊ गोटू मेसरे दोघेही राहणार तुंलगा खुर्द यांचा दोन तासाच्या आत शोध घेत त्यांना अटक केली. पोलिसांनी मंगला व गोटू यांना विचारणा केली असता प्रथम त्यांनी उडवा उडविचे उत्तरे दिली मात्र पोलिसांनी दोघांची वेग वेगळी चौकशी केली असता या हत्येचे बिंग फुटले पोलिसांनी मंगला मेसरे व गोटू मेसरे यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल केला असून अधिक तपास पोलीस करीत आहेत

लग्न झालेल्या मंगलाचे सुत तिरईत व्यक्ती सोबत जुळले मात्र याचा भुर्दंड हा प्रमोदला मिळाला त्याला तर आपल्या जिवाला मुकावे लागले मात्र त्याच्या तीनही मुलांच्या डोक्यावरून वडिलांचे छत्र कायमचे निघून गेले तर आईने वडलिनाची हत्या केल्याने पोलिसांनी तिला देखील अटक केल्याने आता ह्या मुलांचे संगोपण कोण करेल या प्रश्नाचे उत्तर शोधण्यात गावकरी गुरफटले असून या घटनेने परिसरात खळबळ तर गावात हळहळ व्यक्त होत आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!