Mock Drill अकोला रेल्वे स्थानकात घुसले आतंकवादी प्रवाशांना धरले वेठीस पोलिसांनी एकला केले ठार एकास केली अटक

अकोला न्यूज नेटवर्क ब्यूरो दिनांक ३० मे २०२४. :- Mock Drill अकोला शहरातील रेल्वे स्थानक प्लॅटफॉर्म क्रमांक १ वर दुपारी ४ वाजताची वेळ उन्हाळ्याचे दिवस असल्याने प्रवाशांची गर्दी आणि अचानक आतंकवाद्यांनी प्लॅटफॉर्म क्रमांक १ वर हल्ला करणार तोच पोलिसांचा ताफा दाखल झाला आणि चकमक होण्यास सुरुवात झाली.

प्रवासी बिथरले काही प्रवासी घाबरले ही कोणती सिनेमातील स्टोरी नसून आपल्या अकोल्यातील घडलेली ही आज ३० मे २०२४ रोजी दुपारी पाच वाजताच्या दरम्यान घडलेली घडतना आहे.

अकोला रेलवेस्थक प्लॅटफॉर्म क्रमांक १ वर आतंकवादी घुसले आणि येथील विश्राम गृहात काही प्रवाशांना या आतंकवाद्यांनी बंधक बनवले असल्याची माहिती जी आर पी पोलीस स्टेशन च्या api अर्चना गाढवे यांनी अकोला पोलीस दलाला दिली.

mock drill
mock drill

माहिती मिळताच पोलिसांचा ताफा आपल्या अस्त्र शत्रासह रेल्वे स्थानकावर पोहचला पाहता पाहता समस्त्त रेल्वे स्थानक छावणी मध्ये तब्दील झाले रेल्वे पोलीस श्वान पथक, बॉम शोध पथक, देखील दाखल झाले. सज्ज असलेली पोलीस यंत्रणा यांनी आणि आतंकवादी यांची चकमक सुरू झाली यातिल एका आतंकवादीद्यास कंठस्थान घालण्यास पोलिसना यश आले तर पोलिसांनी ऐका आतंकवाद्यांला शिताफीने अटक केली

जेव्हा रेल्वे प्लॅटफॉर्म वर हा सर्व प्रकार सुरू होता तेव्हा नेमके काय सुरू आहे याचा कसलाच अंदाज प्रवाशांना नव्हता संपूर्ण घटनाक्रम आटोपल्या नंतर सदर प्रकार हा माँक ड्रिल असल्याचे लक्षात आले आणि रेल्वे स्थानकावरील प्रवासी तसेच उपस्थितीत नागरिकांनी सुटकेचा श्वास सोडला.

Mock Drill
Mock Drill

दहशतवादी हल्ला किंवा तत्सम गुन्हेगारांना पकडण्यासाठी पोलीस यंत्रणेतील पथकांनी कठीण प्रसंग कसा हाताळला पाहिजे तसेच गुन्हेगारांना शिताफीने आपल्या कब्जात कसे घ्यावे, याचे मॉक ड्रिल आज अकोला रेल्वे स्थानकावर गुरवारी सायंकाळी प्लॅटफॉर्म क्रमांक १ येथे घेण्यात आले.

रेल्वे स्थानकावर सशस्त्र जवानांच्या हालचालींमुळे येथे आलेल्या प्रवाशांमध्ये घबराट पसरली. मात्र, हे सरावसत्र असल्याचे माहीत झाल्यानंतर सुटकेचा निःश्वास सोडला. रेल्वे पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक अजितसिंह राजपूत आरपीएफचे नरवार यांच्यासह इतरही कर्मचारी उपस्थित होते.

Mock Drill
Mock Drill

ही मॉक ड्रिल अकोला पोलीस अधीक्षक बच्चन सिंह अपर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे अकोला शहर उपविभागीय पोलीस अधिकारी सतीश कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनात घेण्यात आलेल्या या ड्रिल वेळी अकोला शहरातील सर्व पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी वाहतुक विभाग रेल्वे पोलीस क्यू आर टी टीम कर्मचारी उपस्थित होते.

Leave a Comment

error: Content is protected !!