WhatsApp

Lok Sabha Election 2024 जिल्ह्यात साडेचार कोटी रकमेच्या जप्तीबद्दल व्हायरल मेसेज फेक, पोलिसा अधीक्षकांचे स्पष्टीकरण

अकोला न्यूज नेटवर्क ब्यूरो दिनांक २६ एप्रिल नितीन कानडजे पाटील बुलढाणा :- Lok Sabha Election 2024 लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बुलढाणा जिल्ह्यातील मतदानाच्या दिवशी साडेचार कोटी रुपयांची रक्कम जप्त करण्यात आली असून शिवसेना कार्यकर्त्यांना अटक करण्यात आल्याचा मेसेज सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मात्र बुलढाणा जिल्हा पोलिसांनी या मेसेजला फेटाळून लावत स्पष्टीकरण देत अशा घटनेबद्दल कुठलीही नोंद नसल्याचे सांगितले आहे.

बुलढाणा लोकसभा मतदारसंघासाठी आज मतदान सुरू Lok Sabha Election 2024 असून या पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर एक मेसेज व्हायरल होत आहे. या मेसेजमध्ये मेहकर येथे साडेचार कोटी रुपयांची रक्कम जप्त करण्यात आली असून शिवसेना कार्यकर्त्यांना अटक करण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे. मात्र बुलढाणा जिल्हा पोलीस अधीक्षक सुनील कडासन यांनी याबद्दलचे स्पष्टीकरण देत अशी कोणतीही घटना घडलेली नसल्याचे सांगितले.

“बुलढाणा जिल्ह्यात अशी कोणतीही घटना घडलेली नाही किंवा कोणताही गुन्हा दाखल करण्यात आला नाही. व्हायरल मेसेज हा फेक स्वरुपाचा आहे. अशा गैरलोकप्रिय मेसेज तयार करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येईल. त्याचप्रमाणे अशा फेक मेसेज तयार करणाऱ्यांचा सायबर सेल शोध घेत आहे,” असे स्पष्टीकरण जिल्हा पोलिस अधीक्षक सुनील कडासन यांनी दिले आहे.

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोशल मीडियावरील गैरलोकप्रिय मेसेज आणि फेकन्यूजच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी अशा घटनेची नोंद नसल्याचे स्पष्ट केले असून मेसेज तयार करणाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशाराही दिला आहे.01:20 PM

Leave a Comment

error: Content is protected !!