WhatsApp

अकोल्यात गस्त घालणाऱ्या पोलिसांवर अंदाधुंद गोळीबाराने खळबळ; हल्ला करणारे दरोडेखोर की शिकारी? तपास सुरु… Firing at policemen

Firing at policemen अकोला न्युज नेटवर्क :- अकोला जिल्ह्यात येत असलेल्या उरळ पोलीस स्टेशन च्या हद्दीतील कंचनपूर ते मांजरी दरम्यान अज्ञात इसमानी काल मध्यरात्रीच्या दरम्यान गस्तीवर असणाऱ्या पोलिसान वर गोळीबार केल्याची घटना घडली असल्याने पोलीस प्रशासन व आसपासच्या परिसरात खळबळ उडाली

अकोला जिल्ह्यातील उरळ पोलीस स्टेशन चा परिसर तसे पाहता संवेदनशील म्हणूनच गणल्या जातो याचं परिसरातून गोवश तस्करी तसेच पेट्रोलचा डेपो असल्या कारणामुळे पोट्रोल चोरी होत असल्याने पोलिसांना नेहमीच सतर्क राहावे लागते. ठाणेदार गोपाळ ढोले यांनी उरळ पोलीस स्टेशन चा पदभार स्वीकारताच गुन्हेगारीवर चांगलाच वचक बसला आहे. उरळ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक गोपाल ढोले यांनी दिलेल्या माहितीनुसार उरळ पोलीस स्टेशन हद्दीत रात्रीच्या सुमारास पेट्रोलिंग वाढवण्यात आली आहे. यामध्ये हातरूण आणि मांजरी भागातही पेट्रालिंग वाढवली आहे. दरम्यान काल रात्री हातरूणचे बीट जमादार दिनकर इंगळे आणि वाहन चालक मूंडे हे चारचाकी पोलीस वाहनात पेट्रोलिंग करत असताना त्यांच्यावर मोटर सायकल स्वार असलेल्या लोकांनी गोळीबार केलाय. Firing at policemen

या घटनेत दोन्ही पोलीस कर्मचारी बचावले आहे, असे ढोले यांनी कळवले आहे. ते म्हणाले की काल मध्यरात्रीनंतर पावणेदोन वाजताच्या सुमारास पोलीस कर्मचारी दिनकर इंगळे आणि वाहनचालक मुंडे हे मांजरी कंचनपूर रस्त्यावर पेट्रोलिंग करत होते. या दरम्यान कंचनकडून दोन मोटरसायकली येत असताना दिसल्या. तेवढ्यात दोन्ही मोटरसायकलस्वारांनी पोलिसांचं वाहन पाहताच आपल्या दुचाकी वाहन वळवलं आणि पळू लागले. इंगळे यांच्या हे निदर्शनास येतात त्यांनी आपल्याला पाहताच का पळ काढला याचा विचार केला आणि त्यांच्या मागे पाठलाग करू लागले. त्यानंतर समोरून एक ॲम्बुलन्स सायरन वाजवत येत होती, त्यामुळे मोटरसायकल स्वारांना समजलं की आपल्याला दोन्हीकडून पोलिसांनी घेरलं. अखेर पोलिसांच्या तावडीतून सुटण्यासाठी त्यांनी पोलिसांच्या वाहनाच्या दिशेने हवेत गोळीबार केला, आणि मोटरसायकल जोरात पळवली. त्यानंतर पोलिसांनी त्याचा पाठलाग सुरू ठेवला.

गोळीबार करणाऱ्यांना पकडण्यासाठी दोन्ही पोलिसांकडून प्रयत्न करण्यात येत होते. परंतु रस्ता खराब असल्यामुळे चारचाकी वाहन चालवण्यात अनेक अडचणीत होत्या. अखेर कंचनपून पर्यंत त्यांचा पाठलाग कायम सुरू ठेवला, नंतर त्यांच्या मोटर सायकली पोलिसांच्या नजरेसमोरून गायब झाली. सुदैवानं उरळ पोलिसांच्या वाहनाचे अंतर दुचाकी पासून शंभर मीटर पेक्षा अधिक असल्याने त्यांच्या बंदुकीचा निशाणा हुकला, अन् दोन्ही पोलीस कर्मचारी बचावले आहेत.

घटनेचे गांभीर्य पाहता अकोला जिल्ह्या पोलीस दलातील वरिष्ठ अधिकारी अपर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे, बाळापूर उप विभागीय पोलीस अधिकारी गोकुळ राज हे उरळ पोलीस स्टेशन येथे तळ ठोकून बसले असून आरोपीचा शोध घेणे सुरु आहे वृत्त लिहे पर्यंत तक्रार दाखल करण्यास सुरवात झाली असून योग्य तो तपास करून पोलीस आरोपीचा कसून शोध घेत आहेत.

पोलिसांवर गोळीबार करण्यात आला ती बंदूक शिकारी साठी वापरण्यात येणारी होती की गोळ्या झाडणारी खरी होती अंधार असल्या मुळे याचा अध्याप पर्यंत तपास लागला नाही मात्र पोलिसान वर बंदूकीने हल्ला करण्यात आला ही बाब तेवढीच खरी असून आता पोलीस तपासा अंतीच काय ते समोर येईल…

Leave a Comment

error: Content is protected !!