WhatsApp

Damaniya VS Bhujbal : वयक्तिक द्वेषापोटी अंजली दमानिया यांच छगन भुजबळ यांच्या घरासमोर पत्रकार परिषदेचा खटाटोप – अमोल मिटकरी

अकोला न्युज डेक्स अनुराग अभंग :- Damaniya VS Bhujbal राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांचे जालनामधील भाषण हे अत्यंत वादग्रस्त असून. मंत्री छगन भुजबळ यांनी मराठा आणि ओबीसी आरक्षणावरून मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधात अनेक विधाने केली. असल्याचा आरोप केला केला. त्यावर हा फक्त वयक्तिक द्वेषापोटी केलेला स्टंट असल्याचा आरोप राष्ट्रवादी अजित पवार गटाचे अकोल्याचे आमदार अमोल मिटकरी यांनी केला.

Damaniya VS Bhujbal: भुजबळांच्या निकालाविरोधात अंजली दमानिया हायकोर्टात जाणार! “कुणाच्या कष्टाचे खात आहेत भुजबळ ? आपल्या ट्वीटमध्ये असा प्रश्न लिहित अंजली दमानिया भूजबळांच्या घरासमोर येऊन खुलासा करणार.” असे जाहीर केले होते.

मात्र तत्पूर्वीच मुंबई सांताक्रुज पोलिसांनी मंत्री छगन भुजबळ यांचे घर असलेल्या परिसरात मोठ्या प्रमाणात पोलीस फौज फाटा तैनात केला. तसेच अंजली दमानिया यांना छगन भुजबळांच्या घरासमोर पोहोचण्याअगोदरच ताब्यात घेऊन जुहू पोलीस ठाण्यात नेण्यात आले आहे.

या बाबत राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते व अकोला जिल्ह्याचे आमदार अमोल मिटकरी यांना आज पत्रकारांनी या प्रकरणा बाबत विचारणा केली असता वयक्तिक द्वेषापोटी अंजली दमानिया यांनी ओबीसी तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांच्या घरासमोर पत्रकार परिषदेचा खटाटोप केला असल्याचं राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी म्हंटलंय..

तर अंजली दमानिया या महिला असून त्यांचा आदर आहे मात्र त्यांनी आरक्षणाच्या मुद्यात उडी टाकू नये असा सल्लाह ही मिटकरी यांनी दिलाय.. तर आज छगन भुजबळ यांच्या घरासमोर अंजली दमानिया द्वारे जबरदस्ती पत्रकार परिषद घेण्याचं कार्य म्हणजे पब्लिसिटी स्टंट असल्याचं मिटकरी म्हणले. असून अमोल मिटकरी यांनी पूर्वीचे ट्विटर व आताचे X या सोशल मीडिया अकाउंट वर देखील खरपूस समाचार घेतला

Leave a Comment

error: Content is protected !!