Buldhana Crime लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई! शस्त्र विकणाऱ्या टोळीला केले जेरबंद, 4 पिस्टल १७ काडतूस सह ४ आरोपींना केली अटक

अकोला न्यूज नेटवर्क ब्यूरो दिनांक १९ एप्रिल नितीन कानडजे (पाटील) बुलढाणा :- Buldhana Crime लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बुलढाणा स्थानिक गुन्हे शाखेने काल रात्री एका मोठ्या कारवाईत मध्यप्रदेशातून जळगाव जामोद तालुक्यातील शस्त्रे विकणाऱ्या टोळीला जेरबंद केले आहे. या टोळीकडून 4 देशी पिस्टल, 17 राऊंड गोळीबार, एक मोटारसायकल, तीन मोबाईल फोन आणि 32,370 रुपये रोख रक्कम असा एकूण 2 लाख 13 हजार 370 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

जळगाव जामोद तालुक्यातील निमखेडी फाट्याजवळ ही कारवाई करण्यात आली. मध्यप्रदेशातील पाचोरी येथून काही व्यक्ती येणार असून देशी बनावटीच्या पिस्टलची डील करणार असल्याची खात्रीलायक माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीनुसार, एलसीबी आणि सोनाळा पोलीस स्टेशनच्या Buldhana Crime संयुक्त पथकाने सापळा रचून ही कारवाई केली.

या कारवाईत पोलिसांनी १) भारसिंग मिसऱ्या खिराडेव रा. पाचोरी तह. खकनार जि. बुरहानपुर (म.प्र.) २) हिरचंद गुमानसिग उचवारे रा. पाचोरो तह, खकनार जि. बुरहानपुर (म.प्र.) ३) आकाश मुरलीधर मेश्राम रा. करुणानगर, बालाघाट (म.प्र.) ४) संदिप अंतराम डोंगरे रा. आमगांव, ता. बालाघाट जि. बालाघाट (म.प्र.) या चार आरोपींना अटक केली आहे.

जिल्हा पोलीस अधीक्षक सुनील कडास यांनी आज पत्रकार परिषदेत या कारवाईची माहिती दिली. त्यांनी यात पोलीस उपअधीक्षक अशोक थोरात, अपर पोलीस अधीक्षक बी.बी. महामुनी,Buldhana Crime उपविभागीय पोलीस अधिकारी डी.एस. गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि चंद्रकांत पाटील यांच्या पथकाने केलेली उत्तम कामगिरीचे कौतुक केले.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बुलढाणा पोलिसांनी केलेली ही कारवाई निश्चितच प्रशंसनीय आहे. या कारवाईमुळे शस्त्रास्त्रांचा गैरवापर रोखण्यास आणि निवडणूक शांततापूर्णपणे पार पाडण्यास मदत होईल.

Leave a Comment

error: Content is protected !!