Ayodhya : अयाेध्येतील श्रीरामाच्या दरबारासाठी तब्बल इतक्या किलाेची महाकाय घंटा; देशभरात चर्चा

अVsar फॅशन अकोला

Ayodhya : अकोला न्युज नेटवर्क : अयाेध्येतील (Ayodhya) रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठा साेहळ्यासाठी जय्यत तयारी सुरू झाली आहे. २२ जानेवारीला प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर ४८ दिवस मंडल पूजा करण्यात येणार आहे. या कार्यक्रमासाठी देशभरातून रामभक्त उपस्थित राहणार आहेत. या श्रीरामाच्या मंदिरातील (Shri Ram Temple) दरबारात २१०० किलोची घंटा बसविण्यात येणार आहे. २१०० किलोची घंटा देशभरात चर्चेत आली आहे. अयोध्येतील राम मंदिरात देशातील ही सर्वात मोठी घंटा (The biggest bell) बसविण्यात येणार आहे. ही घंटा तयार करण्यासाठी २५ लाख रुपयांचा खर्च लागला आहे. ४०० कर्मचाऱ्यांनी ही घंटा तयार केली आहे. डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात ही घंटा राम मंदिरापर्यंत पोहोचविण्यात येणार आहे.

akola news WhatsApp number
akola news WhatsApp number

उद्योगपती आदित्य मित्तल यांच्या कारखान्यात ही घंटा बनवण्यात आली आहे. महाकाय घंटा तयार करण्यासाठी वर्षभरापासून अहोरात्र मेहनत घेण्यात आली. ही घंटा तयार करण्यासाठी २५ लाख रुपयांचा खर्च आला आहे. ही घंटा १५ फूट रुंद आहे. तर ही घंटा आतून ५ फूट रुंद आहे. संपूर्ण घंटा तयार करण्यासाठी एका वर्षाचा अवधी लागला. घुंघरू-घंटी नगर या नावाने प्रसिद्ध असणाऱ्या जलेसरमध्ये ही घंटा तयार करण्यात आली आहे. दरम्यान, राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेच्या कार्यक्रमासाठी सात हजार विशेष पाहुणे आणि चार हजार संत उपस्थित राहणार आहेत. या दिनी जगातील ५० देशातील लोक आणि विविध राज्यातील जवळपास २० हजार लोक उपस्थित राहण्याची शक्यता आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!