WhatsApp

Akola Prostitution “रात्रीस खेळ चाले” अकोला रेल्वे स्टेशन येथील लॉज वर SDPO पथकाचा छापा अल्पवयीन मुलीची सुटका; लॉज मालकासह एकाला अटक

अकोला न्यूज नेटवर्क ब्युरो दिनांक १५ जून २०२४ :-Akola Prostitution अकोला शहर व परिसरात अवैधरित्या वेश्या व्यवसाय (prostitution) जोरात सुरू आहे. शहरातील वेगवेगळे लॉज वर हा व्यवसाय जोमात सुरू असल्याने परिसरातील व्यापारी वर्गामधून संताप व्यक्त होत आहे. बाजारपेठेत सोबतच शहरातील अनेक लॉजमध्ये देहविक्रीचा व्यवसाय सुरु असताना शहर पोलिसांचे मात्र याकडे दुर्लक्ष होत आहे.

असल्याचे काल रात्री १० वाजता रेल्वे स्टेशन वर एका वरील एका लॉज वर SDPO पथकाने केलेल्या कारवाईतून समोर आले विशेष बाब म्हणजे आता या Akola Prostitution व्यवसायात १४ ते १८ वर्षाच्या अल्पवयीन मुली देखील पकडल्या गेल्याने आता हा चिंतेचा विषय बनला असून SDPO पथकाने केलेल्या या कारवाई ऐक अल्पवयीन पीडित मुलीची सुटका केली.

उद्योग, व्यवसाय, सांस्कृतिक चळवळ व विकासाकडे वाटचाल करणारे अकोला शहर यामुळे अकोला शहराची राज्यात वेगळी ओळख तयार झाली आहे. अनेक शहरांमध्ये खुलेआमपणे चालणारा वेश्याव्यवसाय Akola Prostitution आता अकोला शहरात मात्र अद्याप पर्यंत सुरू झालेला नाही. मात्र गेल्या काही महिन्यांपासून या परंपरेला छेद दिला जात आहे. शहरातील अनेक लॉजमध्ये शहरातून, जिल्ह्यातून, जिल्हा बाहेरुन महिला येवून वेश्याव्यवसाय छुप्या पद्धतीने करीत आहेत. सकाळी या महिला शहरात येतात आणि सायंकाळी आपापल्या गावाला निघून जातात. अशीच माहिती अकोला शारत नव्याने आले (SDPO) शहर उपविभागीय पोलीस अधिकारी अकोला सतीश कुलकर्णी यांना मिळाली

असा रचला SDPO पथकाने सापळा…
अकोला शहराला शिस्त लावायची असा विडा उचललेल्या सतीश कुलकर्णी यांनी पदभार स्वीकारताच गुन्हेगार अगदी गपगार करण्यास सुरुवात केली. अशवतच गुप्त माहितीच्या आधारे अकोला रेल्वे स्थानक परिसरातील हॉटेल तसेच लॉज वर वेश्य व्यवसाय सुरू Akola Prostitution

असल्याची माहिती सतीश कुलकर्णी यांना मिळताच कुलकर्णी यांनी प्लॅन रचला आणि आपला एक फंटर वेश्याव्यवसाय करवून घेणाऱ्या दलाला कडे पाठवला ७ हजारात डील झाली आणि ठरल्या प्रमाणे वेळेवर ग्राहक स्टेशन वरील prostitution “महावीर लॉज” वर पोहोचला. आता जाताच आतील रूम मध्ये मुलगी बसली होती तर बाहेर SDPO पथक सापळा लावून तयार होते काही क्षणातच पोलिसांनी तेथे छापा टाकला आणि मुलीसह दलालाला रंगेहाथ अटक केली. Akola Prostitution

Akola Prostitution प्रियकर करवायचा अल्पवयीन प्रियासी कडून देह व्यापार…

अकोला शहरातील रेल्वे स्टेशन परिसरातच नव्हे तर अकोला शहरातील भरपूर लॉज वर रोजच असा देहव्यापार चालतो याची भनक पोलिसांना देखील असते मात्र महिन्याला मिळणारी चिरीमिरी पाहता अधिकारी व कर्मचारी या कडे सरार्स दुर्लक्ष करतात त्याच मुळे हॉटेल व्यवसायिक आणि असेल आंबट शौकीन मजा मारून निघून जातात. पोलिसांनी महावीर लॉज वर छापा टाकला असता धक्कादायक माहिती समोर आली.

या प्रकरणात पडण्यात आलेला दलाल हा वीस वर्षाचा असून त्याचे नाव वैभव राजेश मिरजकर वय २० वर्ष राहणार अकोट फाईल असे आहे. त्यातही या भामट्यांचे बजरंग चौक तसेच खोलेश्वर असे आणखी दोन पत्ते आहेत. कमी वेळात जास्त पैसा मिळवण्यासाठी साठी याने १६ वर्षाचा मुलीला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवले तिला पैशाची गरज असल्याने हाच भामटा प्रियकर या अल्पवयीन मुलीकडून देह व्यापार Akola Prostitution करवून घेत होता वय लक्षात येवू नये म्हणून या बहाद्दराने या अल्पवयीन मुलीचे नकली आधारकार्ड देखील बनवले होते. दिवसभर हा आरोपी ग्राहक शोधत असे ग्राहक मिळाला की आस पासच्या हॉटेल ची रूम बुक करायची आणि पैसा कमवायचा हाच नित्यक्रम सुरू होता मात्र या नराधम अपराध्याचा पापाचा घडा भरला आणि पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या

महावीर लॉज चालवणाऱ्या संचकलाला देखील केले आरोपी… Akola Prostitution
या देह व्यापार करणाऱ्या कारवाईत हॉटेल मालक देखील तासाचे किमान हजार ते २००० हजार घेत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. याच व्यवसाया मार्फत लाखो रुपये हे लॉज चे संचालक कमवून घेतात पण आता अशा लॉज संचालकांवर देखील कराई करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली या प्रकरणी दलाल २० वर्षीय वैभव राजेश मिरजकर याच्यावर पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल केला तर महावीर लॉज चा संचालक रविंद्र महावीर जैन राहणार देशमुख फाईल याच्यावर देखील पिटा ॲक्ट प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यांनी केली ही धडाकेबाज कारवाई… Akola Prostitution
अकोला शहरात खळबळ माजवणाऱ्या या धडाकेबाज कारवाईचा पर्दाफाश अकोला जिल्हा पोलिस अधीक्षक बच्चन सिंह, अपर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे शहर उपविभागीय पोलीस अधिकारी अकोला सतीश कुलकर्णी यांच्या पथकातील चंद्रकला मेसरे, विनय जाधव, अनिल खेडेकर, रविंद्र घिवे, मोहोम्माद नदीम, राज चंदेल, संदीप गुंजाळ यांनी केली तर पुढील तपास रामदास पेठ पोलीस स्टेशन चे API किशोर पवार करीत आहेत.

छुप्या पद्धतीने चालणारा वेश्याव्यवसाय आता थेट अकोल्यातील विविध लॉज मध्ये घुसला आहे. शहरातील बऱ्याच एका लॉज हॉटेल, कॅफे मध्ये हा व्यवसाय छुप्या पद्धतीने सुरू आहे. येथे अनेक महिला व पुरुष ये-जा करताना दिसतात. यामुळे परिसरातील नागरिक व व्यापारी मधून संताप व्यक्त होत आहे. याबाबत या नागरिकांनी शहर पोलिसांना वेळोवेळी कळवूनही पोलिसांनी याबाबत कारवाई केलेली नाही. मात्र अकोला शहर उपविभागीय पोलीस अधिकारी सतीश कुलकर्णी यांनी व यांच्या पथकाने केलेल्या या कारवाई मुळे ऐका अल्पवयीन मुलीची सुटका करून लॉज मालक व यातील दलाला यांना बेड्या ठीकल्याने सर्वत्र त्याचे कौतुक होत असून भविष्यात देखील शहरात अशा कारवाया सुरूच राहायला महिजे अशी चर्चा अकोला शहरात सुरू आहेत.

3 thoughts on “Akola Prostitution “रात्रीस खेळ चाले” अकोला रेल्वे स्टेशन येथील लॉज वर SDPO पथकाचा छापा अल्पवयीन मुलीची सुटका; लॉज मालकासह एकाला अटक”

  1. पोलिस विभागाला हफ्ता न पोहोचल्याने ही कारवाई केली आहे. अकोला पोलिस विभागाने भ्रष्टाचाराच्या सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत

    Reply

Leave a Comment

error: Content is protected !!