Akola Lok Sabha Election 2024 अकोला लोकसभा मतदारसंघासाठी १७ उमेदवारांची निवड पहा कोणाला मिळाली संधी तर कोण झाले बाद

अकोला न्यूज नेटवर्क ब्यूरो दिनांक ५ एप्रिल :- Akola Lok Sabha Election 2024 अकोला जिल्ह्यातील लोकसभा निवडणुकीसाठी २८ उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. त्यापैकी १७ उमेदवारांची अर्ज स्वीकारण्यात आली आहेत. निवडणूक निर्णय अधिकारी अजित कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली ही छाननी प्रक्रिया पार पाडण्यात आली.

अकोला जिल्ह्यातील लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. या निवडणुकीसाठी एकूण २८ उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. परंतु त्यातील फक्त १७ उमेदवारांचीच अर्ज स्वीकारण्यात आली आहेत. उर्वरित ११ उमेदवारांची अर्ज विविध कारणांमुळे नाकारण्यात आली आहेत.

नियोजन भवनात उमेदवार किंवा त्यांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत ही छाननी प्रक्रिया पार पडली. निवडणूक निर्णय अधिकारी अजित कुंभार यांच्यामार्फत ही प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. निवडणूक सामान्य निरीक्षक रामप्रतापसिंग जाडोन आणि स्पेशिफाइड सहाय्यक निवडणूक अधिकारी डॉ. शरद जावळे यांच्यासह अन्य अधिकारीही या प्रक्रियेला उपस्थित होते.

Akola Lok Sabha Election 2024 स्वीकृत उमेदवारांमध्ये प्रकाश यशवंत आंबेडकर (वंचित बहुजन आघाडी), मुरलीधर पवार (अपक्ष), मो. एजाज मो. ताहेर (अपक्ष), धर्मेंद्र चंद्रप्रकाश कोठारी (अपक्ष), अशोक किसन थोरात (अपक्ष), रत्नदीप सुभाषचंद्र गणोजे (अपक्ष), अभय काशिनाथ पाटील (भारतीय राष्ट्रीय काँग्रेस), काशिनाथ विश्वनाथ धामोडे (बहुजन समाज पार्टी), अनुप संजय धोत्रे (भारतीय जनता पार्टी), शेख नजीब शेख हबीब (इंडियन नॅशनल लिग), प्रीती प्रमोद सदांशिव (रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (सोशल), बबन महादेव सयाम (जनसेवा गोंडवाना पार्टी), नारायण हरिभाऊ गव्हाणकर (अपक्ष), रविकांत रामकृष्ण अढाऊ (जय विदर्भ पार्टी), दिलीप शत्रुघ्न म्हैसने (अपक्ष), गजानन साहेबराव दोड (अपक्ष) आणि ॲड. उज्ज्वला विनायक राऊत (प्रबुद्ध रिपब्लिकन पार्टी) यांचा समावेश आहे.

तर नाकारलेल्या उमेदवारांमध्ये रमेश इंगळे (बहुजन समाज पार्टी), अरूण भागवत (अपक्ष), पूजा शर्मा (अपक्ष), सचिन शर्मा (अपक्ष), नितीन वालसिंगे (अपक्ष), महेंद्र मिश्रा (अपक्ष), अंबादास दांदळे (अपक्ष), प्रमोद पोहरे (अपक्ष), ॲड. रामभाऊ खराटे (वीरों के वीर इंडियन पार्टी), रजनीकांत (अपक्ष) आणि शेख मजहर शेख इलियास (अपक्ष) यांचा समावेश आहे.

उमेदवारी अर्ज दिनांक ८ एप्रिल रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत मागे घेता येतील. शनिवारी (दि. ६ एप्रिल) रोजी निवडणूक कार्यालय सुरू राहील. लोकसभा निवडणुकीची प्रक्रिया पुढे सुरू राहणार आहे. या निवडणुकीमध्ये कोणाला यश मिळेल हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.

Leave a Comment

error: Content is protected !!