Akola Crime अकोला रेल्वे स्थानकावर गुंडाराज! पोलिसांचे दुर्लक्ष तर प्रवाशांचा जीव धोक्यात!

अकोला न्यूज नेटवर्क ब्यूरो दिनांक ११ जून: Akola Crime अकोला रेल्वे स्थानक परिसरात गुंडगिरी वाढली आहे. रेल्वे पोलीस आणि जीआरपी पोलिसांच्या दुर्लक्षामुळे प्रवासी आणि नागरिकांचा जीव धोक्यात येत आहे. रात्री 11 वाजल्यानंतर संपूर्ण रेल्वे स्थानक परिसर टोळी, जेबकट आणि नशा करणाऱ्यांच्या ताब्यात जातो. प्रवाशांना प्रवास करायचा की आपला जीव वाचवायचा या दुविधेतून जावे लागते.

रेल्वे पोलिसांचा वचक कमी झाल्याने चोरांसाठी हे रेल्वे स्थानक दिवाळीसारखे आहे, तर प्रवाशांसाठी शिमगा करणारे ठरत आहे. बॅग, मोबाईल, पैसे चोरी होणं ही नित्याची बाब बनली आहे. Akola Crime काही प्रवासी घाईमुळे तक्रार करतात, तर काही नुकसान सहन करून पुढील प्रवासाला निघून जातात. चोरी-मोबाईल चोरी करणाऱ्यांचे धाडस वाढली आहे की पैसे न दिल्यास हत्या करण्यापासूनही ते मागेपुढे पाहत नाहीत.

Akola Crime 11 जुलै रोजी मध्यरात्रीच्या सुमारास अकोला रेल्वे स्थानकावरील जुन्या पुलावर दोन तरुणांनी शेख मोहसीन शेख फारूक (22 वर्षे, राहणार शंकर नगर, अकोट फाईल, अकोला) यांच्यावर हल्ला केला. त्याच्याकडून मोबाईल आणि पैसे हिसकावण्याचा प्रयत्न केला. मोहसीन यांनी प्रतिकार केला असता त्यांना चाकूने वार करून गंभीर जखमी केले. चाकू दाखवून मोबाईल हिसकावून हे गुंड फरार झाले.

घटनेची माहिती मिळताच जीआरपी पोलीस स्टेशनच्या अर्चना गाढवे आणि आरपीएफ एसएचओ युनूस खान यांच्या टीमने घटनास्थळी पोहोचून जखमी मोहसीन यांना स्थानिक नागरिकांच्या मदतीने रुग्णालयात दाखल केले. त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. दोन्ही आरोपी सीसीटीव्हीत कैद झाले आहेत आणि रेल्वे पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

पोलिस घटनास्थळी पोहोचतात, मात्र अति वर्दळीच्या ठिकाणी रेल्वे आणि जीआरपी पोलिसांनी गस्त वाढवली तर अशा घटनांना नक्कीच आळा बसेल.

Leave a Comment

error: Content is protected !!