WhatsApp

Accident पुण्यासारख्या थरार पातुरात चक्क हॉटेलमध्ये कार घुसवली ! एक जण ठार

अकोला न्यूज नेटवर्क ब्यूरो न्यूज नेटवर्क, अकोला प्रतिनिधी : Accident स्वप्निल सुरवाडे दि. 29 जून 2024 पातूर :- पातूर शरार कार ने दोघांना धडक दिली आणि त्यांचा जीव गेला त्या नंतर देखील नागरिक सुधारण्याचे नाव घेत नसल्याचे दिसून येत असून आज अकोला जिल्ह्यात येत आलेल्या पातूर येथे शहर पोलीस स्टेशन समोर असलेल्या चक्क एका हॉटेलमध्ये कार घुसल्याने अपघात होऊन एका निष्पाप व्यक्तीला आपले प्राण गमवावे लागले.

पातूर शहरातील जुने बस स्थानक येथील पोलीस स्टेशनच्या अगदी समोर असलेल्या दिलखुश हॉटेलमध्ये एका कारचालकाने भरधाव वेगात निष्काळजीपणाने आपली एम.एच. 32 वाय 2465 क्रमांकाची मारुती अल्टो कार घुसवली Accident असता हॉटेलमध्ये पाण्याची कॅन भरण्याकरिता उभ्या असलेल्या एका व्यक्तीस कारची जोरदार धडक लागून तो कारखाली चिरडल्या गेला.

गंभीर जखमी झाला असून सदर जखमीस प्राथमिक आरोग्य केंद्र, पातूर येथे नेले असता डॉक्टरांनी तत्काळ अकोला येथे हलविण्यास सांगितल्याने सदर जखमीस अकोला येथील सर्वोपचार रुग्णालयात नेले असता Accident उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.सदर अपघातातील मृतक अभिजित अनिल शेंडे (वय 29) रा.भंडारज ता.पातूर येथील असल्याचे निष्पन्न झाले आहे.

दरम्यान वृत्त लिहिस्तोवर कारचालक Accident मो.अताऊर रहेमान मो.समीऊर रहेमान (वय 57) रा.निर्माण कॉलनी,गंगा नगर,बायपास, अकोला याचे विरोधात सदर प्रकरणी पातूर पोलिसात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

Leave a Comment

error: Content is protected !!