WhatsApp

Akola Crime अकोल्यात चोऱ्यांची सुनामी! पोलिसांच्या पेट्रोलिंगला चकमा देत चोरट्यांनी खदान परिसरात केली घरफोडी

अकोला न्यूज नेटवर्क ब्यूरो २० मे २०२४: Akola Crime अकोला शहरात चोऱ्यांचा सत्र सुरूच आहे. आणि चोरटे पोलिसांच्या पेट्रोलिंगला चकमा देत यशस्वीरित्या चोरी करत आहेत. पोलिसांनी राबवलेल्या ‘क्युआर कोड स्कॅनिंग गरुडा पेट्रोलिंग’ पद्धतीलाही चोरटे भेदून चोरी करत आहेत. चोरीच्या घटनांवरून असे दिसून येते की चोरट्यांनी पोलिसांच्या वेळेचा पुरेपूर अभ्यास केला आहे.

आजही खादान पोलीस स्टेशन हद्दीत घरफोडी!Akola Crime
आज सकाळी, खादान पोलीस स्टेशन हद्दीतील खेतान नगर परिसरात सागर देशमुख यांच्या घरी चोरी झाल्याची घटना उघडकीस आली. देशमुख कुटुंब देवदर्शनासाठी बाहेर गावी गेले होते, त्यावेळी चोरट्यांनी घरात शिरून चोरी केली. घराचे कुलूप तोडून चोरटे आत प्रवेशले आणि कपाट फोडून रोख रक्कम आणि मौल्यवान वस्तू असा अंदाजे १ लाखाच्या मुद्देमालावर चोरट्यांनी हात साफ केला.

पोलिसांनी तपास केला सुरू Akola Crime
घरी परत आल्यावर देशमुख यांना चोरीची जाणीव झाली आणि त्यांनी त्वरित खादान पोलीसांना माहिती दिली. घटनास्थळी पोहोचलेल्या खादान पोलीस स्टेशनचे प्रभारी पोलिस निरीक्षक किनगे यांनी तात्काळ तपास सुरू केला. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता, पोलीस अधीक्षक बच्चन सिंह, शहर उपविभागीय पोलीस अधिकारी सतीश कुलकर्णी आणि स्थानिक गुन्हेगारी शाखेचे पोलिस निरीक्षक शंकर शेळके यांनीही घटनास्थळी भेट दिली. श्वान पथक ठसे तज्ञ देखील घटनास्थळी दाखल झाले असून या चोरीचा कसून तपास सुरू आहे.

सीसीटीव्ही फुटेजमध्ये चोरटे कैद Akola Crime
पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले असता १७ मे रोजी रात्रीच्या सुमारास दोन अज्ञात व्यक्ती घरात शिरताना दिसून आले. चोरीच्या घटनांमुळे खदान परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

पोलिसांसाठी आव्हान Akola Crime
सतत होणाऱ्या चोऱ्या पोलिसांसाठी आव्हानात्मक बनत आहेत. या घटनांना अंकुश लावण्यासाठी ठोस उपाययोजना गरजेची आहे. पोलिसांनी पेट्रोलिंग वाढवणे आणि सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे जाळे विस्तृत करणे गरजेचे आहे. तसेच, नागरिकांनीही सतर्क राहणे आणि संशयास्पद हालचालींची माहिती पोलिसांना देणे गरजेचे आहे.

अकोल्यातील नागरिकांना अकोला न्यूज नेटवर्कच्या वतीने नम्र विनंती: Akola Crime

  • घरातून बाहेर जाताना दरवाजे आणि खिडक्या व्यवस्थित बंद करा.
  • मौल्यवान वस्तू घरात ठेवू नका.
  • सीसीटीव्ही कॅमेरे आणि सिक्युरिटी अलार्म सिस्टमचा वापर करा.
  • संशयास्पद हालचालींची माहिती त्वरित पोलिसांना द्या.

Leave a Comment

error: Content is protected !!