Akola Accident भरधाव दुचाकी एकमेकांवर आदळल्या भीषण अपघत एकाच मृत्यू २ गंभीर

अकोला न्यूज नेटवर्क ब्यूरो दिनांक ३१ मे २०२४ :- Akola Accident अकोला शहरात बाईक चलवणाऱ्यांची क्रेझ जीवघेणी ठरत असल्याचे चित्र सद्या सर्वत्र दिसत असून अती वेग जीवघेणा ठरत असल्याचे चित्र आज दहा वाजताच्या दरम्यान अती वर्दळीचे ठिकाण असलेल्या टिळक रोड वर दिसून आले.

Akola Accident असा घडला अपघात…
टिळक रोड हा रस्ता अती वर्दळीचा असून या रस्त्यावर रात्री १२ वाजे पर्यंत वाहतूक सुरूच असते त्या मुळे या वाहतुकीच्या रस्त्यावर सहसा अपघात होत नाही पण गुरुवार ची रात्र मात्र याला अपवाद ठरली रात्री १०:३० ते ११ वाजताच्या दरम्यान या रस्त्यावरून बिना नंबर प्लेटची पल्सर ही दुचाकी १२० च्या स्पीड ने वाऱ्याशी गप्पा करत सुसाट जात होती अती वेगाने चालत असलेली ही दुचाकी अचानक समोरून येणारी मोपेड क्रमांक ऐम ऐचं ३० ए ऐस ३९५६ या मोपेड वर येवून आदळली सदर अपघात एवढा भयानक होता की ही धडक लागताच दोन्ही दुचाकीवर वक्ती हवेत १५ ते २० फूट वरती फेकल्या जावून जमिनीवर आदळले या अपघात दोन्ही दुचाकीचा चुराडा झाला व त्या दोन्ही गाड्या एकमेकात फसल्या गेल्याने या अपघातातील पल्सर दुचाकीचा वेग किती भयंकर होता याचा अंदाज लागू शकतो.

Akola Accident
Akola Accident

Akola Accident अपघातात एक ठार तीन गंभीर जखमी…
या भीषण अपघातात दोन्ही दुचाकीस्वार भीषण गंभीर जखमी झाले घटनेची माहिती मिळताच सिटी कोतवाली पोलिस घटनास्थळी दाखल होवून स्थानिक नागरिकांच्या मदतीने जखमींना अकोला जिल्हा सरोपचार रुग्णालय येथे भरती काण्यात आले या अपघातातील इम्रान खान इस्माईल खान वय 45 वर्ष राहणार माणिक टॉकीजच्या मागे अकोट स्टँड यांचा जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून अती रक्तस्त्राव झाल्याने त्यांचा मृत्यू झाला दुसऱ्या मोटारसायकलवरील स्वार साहिल खान युनूस खान वय 20 वर्षांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे, तर फरहान खान सईद खान, दोघेही बसस्थानकाजवळील इराणी वस्तीत राहतात, अशीही माहिती सर्वोपचार रुग्णालयातून मिळून आली.

Akola Accident मृतक इम्रानच्या घरचे निघाले होते हज यात्रेला…
मृतक इम्रान खान इस्माईल खान हे आपल्या मोपेड वरून शांततेत आपल्या घरी जात होते तर त्यांच्या परिवारातील सदस्य आजच हज करीता नागपूर ला गेले होते व आज रात्री ११ वाजता त्यांना नागपूर येथील हवाई अड्डयावरून हज करीता रवाना होणार होते देवदर्शनाला जाणाऱ्या या परिवारावर न निघून येणारा आघात घडला व आपल्या मुलाचा अपघाती जीव गेल्याने त्यांना नागपूर वरून अकोल्यातील परत यावे लागले इम्रान यांच्या अचानक जाण्याने यांच्या परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला असून शांत आणि मन मिळावु इम्रान खान इस्माईल खान यांच्या जाण्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Akola Accident शहरातील या बेभान वाहतुकीला आळा घालणे आहे गरजेचे…
अकोला वाहतूक विभाग तसेच अकोला परिवहन विभाग हे नागरिकांना वारंवार सांगून देखील पालक या कडे दुर्लक्ष करतात आणि आपल्या मुलांना दुचाकी घेवून देतात लाखो रुपयांच्या दुचाकी तर पालक घेवून देतात मात्र त्यांचे पाल्य ह्याच दुचाकी सुसाट चालवून आपला किंवा इतरांचा अनोमोल असलेला जीव गमावून बसतात अशा घटनांना आळा बसण्यासाठी अकोला पोलीस वाहतूक विभाग तसेच आरटीओ विभागाने नियम आणखी कडक करून अशा नियम मोडणाऱ्या जीवघेण्या दुचाकी स्वारांवर कडक शासन लावणे गरजेचे आहे. मात्र अकोला शरात हेच विभाग थातूरमातूर कारवाया करून प्रसिध्दी मिळविण्यात व्यस्त असल्याने असे अपघात घडत असल्याची चर्चा सध्या अकोला शहरात सुरू आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!