Akola Accident बाळापूर-पातूर मार्गावरील कठडे नसलेल्या पुलावर भीषण अपघात, कार नदीत कोसळली दोघे गंभीर जखमी!

अकोला न्यूज नेटवर्क ब्यूरो दिनांक १८ मे राहुल सोनोने प्रतिनिधी वाडेगाव: Akola Accident बाळापूर-पातूर मार्गावरील चान्नी फाटा जवळील पुलावर शनिवारी संध्याकाळी भीषण अपघात झाला. या अपघातात दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. चान्नी फाटा जवळील पुलावर कठडे नसल्याने हा अपघात घडला असावा, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पातूरकडून बाळापूरकडे जाणाऱ्या तांदूळ भरलेल्या ट्रकला विरुद्ध दिशेने येणाऱ्या एका गाडीने धडक दिली. Akola Accident ही गाडी पुलावरच लटकली होती. गाडीतील शेख अमीर (24) आणि हसिफ शहा मेहबुब शहा हे दोघे जण वाशीम जिल्ह्यातील रिसोड येथील रहिवासी आहेत. दोघेही गाडीतच अडकून पडले होते.

स्थानिक नागरिकांनी शर्तीचे प्रयत्न करून दीड तासानंतर जखमींना बाहेर काढले. या अपघातामुळे दोन्ही बाजूंना दीड ते दोन किलोमीटरपर्यंत वाहतूक कोंडी झाली होती. Akola Accident घटनास्थळी मनीष इंगळे, अतुल महल्ले, विजय सोळंके, जीवन इंगळे, कपिल इंगळे, महेश उजाडे, रोहन वेलकर, दामोदर उजाडे, राहुल इंगळे, निलखंठ अरखराव आदी उपस्थित होते. त्यांनी जखमींना बाहेर काढून नजीकच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले. रुग्णवाहिकेतील डॉ. मोहम्मद शहजन, सचिन वरोकार, शेख शहजाद, विठ्ठल नळकांडे यांनी जखमींवर प्राथमिक उपचार केले.

वाडेगाव पोलीस चौकीचे समाधान रिठे, विनायक पवार आदींनीही घटनास्थळी धाव घेतली. ट्रकमधील तांदूळ उलटून पडले. Akola Accident जखमी गाडीही जेसीबीने पुलाखालून काढली असता तिचा चुराडा झाला आहे. या अपघाताबाबत अधिक तपास सुरू असून पुलावरील कठड्यांच्या अभावामुळेच हा अपघात घडला असावा, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.

या भीषण अपघातामुळे Akola Accident संपूर्ण परिसरात खळबळ उडाली होती. चान्नी फाटा जवळील पुलावरील कठड्यांच्या अभावाबद्दल नागरिकांकडून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. अशा अनेक धोकादायक पुलांमुळेच अनेकदा मोठ्या प्रमाणात अपघात होतात. त्यामुळे अधिकारी यांनी या पुलावर लवकरात लवकर कठडे बसविण्याची मागणी करण्यात येत आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!