WhatsApp

मराठा आंदोलक आक्रमक! जालन्यातील तिर्थपुरीत भर रस्त्यावर एसटी बस पेटवली,

अकोला न्युज नेटवर्क दिनांक २६ फेब्रुवारी २०२४ :- जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यातील तीर्थपुरी शहरात अज्ञातांनी बस पेटवून दिल्याची घटना समोर आली आहे. तिर्थपुरी गावात आज सकाळी साडेसहाच्या सुमारास अंबड येथून रामसगावकडे जाणाऱ्या अंबड आगाराच्या या बसला आडवून अज्ञातांनी पेटवून दिले आहे. यावेळी बसच्या काचा देखील फोडण्यात आल्याचे समोर येत आहे. या घटनेनंतर जालना पोलिस अधीक्षक यांनी दिलेल्या निर्देशानुसार एसटी महामंडळाची वाहतूक तात्पुरती थांबविण्यात आल्याची देखील माहिती मिळत आहे. मनोज जरांगे यांनी आक्रमक भूमिका घेतल्याने मराठा आंदोलक देखील आक्रमक होतांना पाहायला मिळत आहे.

आज सकाळी 6 ते 7 वाजेदरम्यान अज्ञात लोकांनी जाळण्यात आली, सध्या तीर्थपूरी मार्केट बंद करण्यात आले आहे. रविवारी रात्री उशिरा अंबड तालुक्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. दरम्यान आज सकाळ पासून जिल्हाभरात तणावाचे वातावरण तयार झाले आहे.मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर जरांगे पाटील यांचे सहकारी शैलेंद्र पवार यांना आज पहाटे 4 वाजता पोलिसांनी ताब्यात घेतल्याने तीर्थपूरीत तणावाचे वातावरण निर्माण झाले असून, सरकाराच्या दडपशाहीच्या निषेधार्थ मराठा समाज आक्रमक झाल्याचे दिसून येत असून त्याचेच परिणाम म्हणून बस जाळण्यात आल्याचे समजते, तसेच तीर्थपुरी बाजारपेठ उघडली नसून व्यापाऱ्यांनी आपले व्यवहार बंद ठेवल्याचे दिसत आहे,

राज्य परिवहन मंडळाच्या अंबड आगाराचे बस क्र.1822 अंबड- रामसगाव मुक्काम करून परत येत होती. तसेच यावेळी आंदोलकांनी बस पेटवून दिली आहे. या घटनेबाबत आगार व्यवस्थापक यांच्याकडून पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरु आहे. त्यामुळे मराठा आंदोलक पुन्हा एकदा आक्रमक होतांना पाहायला मिळत आहे.

जालना जिल्ह्यातील एसटी सेवा बंद….
जालना-घनसावंगी तालुक्यातील तिर्थपुरी गावात अज्ञातांनी बस पेटवून दिल्याची घटना समोर आल्याने राज्य परिवहन मंडळाकडून खबरदारी म्हणून एसटी बस बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. पोलिसांच्या सुचनेनुसार जालना जिल्ह्यातील बस सेवा बंद ठेवण्याचा निर्णय झाला आहे. त्यामुळे परिवहन मंडळाने जिल्ह्यातील 5 आगरांच्या बस बंद करण्याच्या निर्णय घेतलाय, पोलिसांचे पुढील आदेश येऊपर्यत बस बंद राहणार आहे. विशेष म्हणजे पैठण- संभाजीनगर एसटी बस सेवा देखील बंद ठेवण्याचा निर्णय झाला आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!