अकोट अकोला मार्गावर अपघाताची मालिका सुरूच दोन मोटर सायकल चे अपघात तिघे गंभीर जखमी

अकोला न्युज नेटवर्क दिनांक ९ मार्च २०२४ :- अकोट अकोला महामार्ग वर असलेले करोडी फाटा जवळ शुक्रवारी ८ मार्च रोजी संध्याकाळी ८ वाजे चे सुमारास दोन मोटार सायकल यांच्यात जोरदार धडक होवून तीघे जखमी झाले असून एक गंभीर असल्याने त्याला अकोला येथील जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे

सविस्तर वृत्त असे की अकोट अकोला महामार्ग वर असलेले करोडी फाटा जवळ दोन
मोटार सायकल यांच्यात जोरदार धडक होवून दुचाकीवरील तीघे जखमी झाले असून एक गंभीर असल्याने त्याला अकोला येथे जिल्हा रुग्णालयात हलविण्यातआले आहे.

या बाबत समजलेली माहिती अशी की, मोटार सायकल एम एच २७ ए पी ८३९७ व एम एच ३० एक्स १३५८ यांची समोरासमोर जोरात धडक झाली, त्यात मोटार सायकल स्वार तीन जणांना गंभीर दुखापत झाली आहे. चोहोट्टा बाजार पोलीस चौकी वरील पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळावर धाव घेऊन जखमींना उपचारासाठी अकोला शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले.वृत्त लिही पर्यंत अपघातग्रस्तांचा नाव कळू शकले नाही तसेच अपघात मध्ये कुणाची चूक अद्याप स्पष्ट झाले नाही.

Leave a Comment

error: Content is protected !!