पोलीस वर्धापन दिनानिमित्त दहीहांडा पोलीस ठाण्यात विद्यार्थ्यांसाठी विशेष जनजागृती उपक्रम

पोलीस वर्धापन दिनाचे औचित्य साधत पोलीस स्टेशन दहीहांडा येथे विद्यार्थ्यांसाठी विशेष जनजागृती आणि मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमांत रूपनाथ महाराज विद्यालय तसेच श्री जिल्हा परिषद उर्दू हायस्कूल येथील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना आमंत्रित करण्यात आले होते.

कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांना पोलीस ठाण्यातील शस्त्रसामग्री दाखवून त्यांची मूलभूत माहिती देण्यात आली. पोलिसांची कार्यपद्धती, जबाबदाऱ्या आणि आपत्कालीन परिस्थितीत पोलिसांची भूमिका याविषयी विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष उदाहरणांसह मार्गदर्शन करण्यात आले.

यावेळी दामिनी पथक, मार्शल, पोलीस काका–पोलीस दीदी योजना यांची सविस्तर माहिती देण्यात आली. तसेच चाइल्ड हेल्पलाइन क्रमांक 1098, डायल 112 या आपत्कालीन सेवांबाबत विद्यार्थ्यांना जागरूक करण्यात आले.

सायबर गुन्हे आणि त्याचे दुष्परिणाम, ऑनलाइन फसवणूक, सोशल मीडियावरील धोके याविषयीही विद्यार्थ्यांना समजावून सांगण्यात आले. यासोबतच POCSO Act, विद्यार्थी सुरक्षा, तसेच Good Touch – Bad Touch या विषयांवर थोडक्यात पण प्रभावी मार्गदर्शन करण्यात आले.

या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये कायदा, सुरक्षा आणि स्वसंरक्षणाबाबत सकारात्मक जाणीव निर्माण झाली असून, पोलीस आणि विद्यार्थी यांच्यातील विश्वास अधिक दृढ झाला आहे. अशा उपक्रमांमुळे समाजात सुरक्षिततेचा संदेश पोहोचत असल्याची प्रतिक्रिया उपस्थितांकडून व्यक्त करण्यात आली.

https://www.instagram.com/reel/DTAOcbnDaq_/?igsh=MTBlZzBoY3Z1aHQzdQ==

Leave a Comment