Ads

--

चारित्र्याच्या संशयातून पत्नी-लेकाचा कुऱ्हाडीने खून; आरोपी राहुलला १५ दिवसांची न्यायालयीन कोठडी

By Nilesh Sir

December 31, 2025 3:12 pm

Ads

चारित्र्याच्या संशयाचा भयानक शेवट… संशयाने माणुसकीला हरवून टाकलं आणि एका कुटुंबाचं संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त झालं. बुलढाणा जिल्ह्यात पत्नी आणि चार वर्षांच्या निरागस मुलाच्या कुऱ्हाडीने केलेल्या निर्घृण हत्येने समाजमन हादरून गेलं आहे.

बुलढाणा जिल्ह्यात चारित्र्याच्या संशयातून पत्नी आणि चार वर्षांच्या चिमुकल्याची निर्घृण हत्या करणाऱ्या आरोपीला न्यायालयाने १५ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. यापूर्वी न्यायालयाने आरोपीला एक दिवसाची पोलीस कोठडी दिली होती.

ही धक्कादायक घटना २९ डिसेंबर रोजी पहाटे सुमारे २.३० वाजता उघडकीस आली होती. आरोपी राहुल याने पत्नी रुपाली म्हस्के आणि चार वर्षांचा मुलगा रियांश यांची कुऱ्हाडीने हत्या केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. या घटनेने संपूर्ण परिसर हादरून गेला होता.

या प्रकरणी मोळा येथील भास्कर शंकर वानखेडे (वय ५५) यांनी दिलेल्या तक्रारीवरून आरोपी राहुलविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपीला अटक करून मेहकर न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्याला एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली होती.

पोलीस कोठडीची मुदत संपल्यानंतर ३० डिसेंबर रोजी आरोपीला पुन्हा न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी न्यायालयाने त्याला १५ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावत त्याची कारागृहात रवानगी केली आहे.

या दुहेरी हत्येच्या घटनेने जिल्ह्यात खळबळ उडाली असून, चारित्र्याच्या संशयातून घडलेल्या या अमानुष कृत्यावर समाजातून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

Related Article

दुष्काळाचा बाजारपेठेला फटका! अकोल्यात डाळींच्या किमतीत १० ते १५ टक्क्यांनी वाढ; तांदळाचे दरही गगनाला

संगीता कुशवाह मृत्यू प्रकरण: सासरच्या तिघांचा अटकपूर्व जामीन फेटाळला; सरकारी वकिलांचा युक्तिवाद ठरला महत्त्वाचा

दुचाकी-ट्रकची जोरदार धडक; २२ वर्षीय युवक गंभीर जखमी, प्राथमिक उपचारानंतर अकोल्यातील सर्वोपचार रुग्णालयात हलविले

अकोला जिल्ह्यात दुष्काळी पंचनाम्यांना वेग; आतापर्यंत 1.85 लाख शेतकऱ्यांच्या 3.06 लाख हेक्टर क्षेत्राचे पंचनामे

महिला सक्षमीकरणाला बाळापूर नगरपालिकेची चालना; १०० महिलांना शिलाई प्रशिक्षणाची प्रमाणपत्रे

पातूरमध्ये शाळेतील प्रवेशासाठी १० ते १५ हजार रुपयांची मागणी? खासगी शाळांवर पालकांचे गंभीर आरोप

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!