Ads

अमरावती शिक्षक मतदारसंघासाठी उद्या मतदान; अकोल्यात १३ केंद्रांवर तयारी पूर्ण

By Nilesh Sir

October 22, 2026 4:26 pm

Ads

अकोला न्यूज नेटवर्क ब्युरो दिनांक २२ ऑक्टोबर २०२६ : अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाच्या द्विवार्षिक निवडणुकीसाठी उद्या, शुक्रवार, २३ ऑक्टोबर रोजी मतदान होणार आहे. या निवडणुकीसाठी अकोला जिल्हा प्रशासनाने तयारी पूर्ण केली असून, जिल्ह्यातील १३ मतदान केंद्रांवर एकूण ५ हजार ९४२ शिक्षक मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. सकाळी ८ ते दुपारी ४ या वेळेत मतदान प्रक्रिया पार पडणार आहे.

मतदान प्रक्रिया शांततापूर्ण, सुरळीत आणि पारदर्शक वातावरणात पार पाडण्यासाठी प्रशासनाकडून आवश्यक व्यवस्था करण्यात आली आहे. मतदान केंद्रांवर अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असून, कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस विभागही सज्ज झाला आहे.

अकोला शहरात सहा मतदान केंद्रे

जिल्ह्यात अकोट येथे दोन, तेल्हारा येथे एक, अकोला शहरात सहा, बाळापूर येथे एक, पातूर येथे एक, मूर्तिजापूर येथे एक आणि बार्शीटाकळी येथे एक, अशी एकूण १३ मतदान केंद्रे निश्चित करण्यात आली आहेत.

अकोला शहरातील राधादेवी गोयनका महिला महाविद्यालय आणि सिताबाई कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय येथे प्रत्येकी तीन मतदान केंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे. जिल्ह्यातील सर्व केंद्रांवर मिळून ५ हजार ९४२ शिक्षक मतदार मतदानासाठी पात्र आहेत.

मतदान करताना नियमांचे पालन आवश्यक

मतदारांनी मतदान करताना मतपत्रिकेसोबत देण्यात आलेल्या जांभळ्या शाईच्या स्केच पेनचाच वापर करावा. पसंतीच्या उमेदवाराच्या नावासमोरील रकान्यात ‘१’ हा पसंतीक्रम नोंदविणे आवश्यक आहे. पुढील पसंतीक्रम नोंदविणे ऐच्छिक आहे.

मतपत्रिकेवर स्वाक्षरी, नाव, आद्याक्षरे किंवा अन्य शब्द लिहू नयेत. अंगठ्याचा ठसा उमटवू नये तसेच टिकमार्क किंवा ‘X’ अशी खूण करू नये. पसंतीक्रम अंकांमध्ये नोंदवावा आणि एकाच क्रमांकाची पुनरावृत्ती टाळावी. नियमांचे उल्लंघन झाल्यास मतपत्रिका अवैध ठरण्याची शक्यता आहे. मतदान केंद्राच्या १०० मीटर परिसरात मोबाईल फोन किंवा अन्य इलेक्ट्रॉनिक उपकरणे सोबत नेण्यास मनाई असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

१३ मतदान केंद्रांसाठी अधिकारी-कर्मचारी नियुक्त

जिल्ह्यातील १३ मतदान केंद्रांसाठी १३ मतदान केंद्राध्यक्ष, ३९ मतदान अधिकारी आणि १३ सूक्ष्म निरीक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. मतदान केंद्रांवर देखरेख ठेवण्यासाठी उपविभागीय अधिकाऱ्यांची क्षेत्रीय अधिकारी म्हणून, तर कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांची नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

शिक्षक मतदारसंघाची निवडणूक शांततेत आणि पारदर्शक वातावरणात पार पाडण्यासाठी प्रशासनाने आवश्यक तयारी पूर्ण केली आहे. पात्र शिक्षक मतदारांनी आपल्या मतदान केंद्राची माहिती तपासून निर्धारित वेळेत मतदानासाठी उपस्थित राहावे आणि लोकशाही प्रक्रियेत सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी, अकोला यांच्या वतीने करण्यात आले आहे.

Related Article

अमरावती शिक्षक मतदारसंघासाठी उद्या मतदान; अकोल्यात १३ केंद्रांवर तयारी पूर्ण

राजू शर्माची दादागिरी सात लाखांच्या कर्जापोटी शेतजमीन हडपल्याचा आरोप; शेतातील कापूसही नेल्याची तक्रार,

Diwali Vacation 2026: महाराष्ट्रातील शाळांना दिवाळीच्या सुट्ट्या जाहीर; २ नोव्हेंबरपासून सुट्ट्यांना सुरुवात

अल्पवयीन मुलीशी संबंधित विनयभंग प्रकरणातील आरोपीला जामीन मंजूर ॲड. कैलास व्ही. अनमाने यांचा सटिक युक्तिवाद

प्रत्येक नागरिक पत्रकार होऊ शकतो का? पत्रकारांच्या ओळखीबाबत सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

अकोल्यातील न्यू तापडिया नगर रेल्वे गेट लवकरच सुरू होणार? उड्डाणपूल जानेवारीअखेर खुला करण्याचे निर्देश

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!