Ads

अकोला जिल्ह्यात दुष्काळी पंचनाम्यांना वेग; आतापर्यंत 1.85 लाख शेतकऱ्यांच्या 3.06 लाख हेक्टर क्षेत्राचे पंचनामे

By Nilesh Sir

October 6, 2026 6:29 pm

Ads

अकोला न्यूज नेटवर्क ब्युरो दिनांक ६ आटोंबर २०२६ :- खरीप हंगाम 2026 मध्ये पावसाने मोठी ओढ दिल्याने अकोला जिल्ह्यात निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर शेतपिकांच्या नुकसानीचे पंचनामे सुरू आहेत. 6 ऑक्टोबर 2026 रोजीच्या दैनंदिन अहवालानुसार, जिल्ह्यात आतापर्यंत 1 लाख 85 हजार शेतकऱ्यांच्या एकूण 3 लाख 6 हजार 325.40 हेक्टर क्षेत्राचे पंचनामे पूर्ण झाले आहेत. संबंधित अहवालानुसार, पंचनामे करण्याचे एकूण क्षेत्र 4 लाख 7 हजार 292.23 हेक्टर असून त्यापैकी 75.21 टक्के क्षेत्राचे पंचनामे पूर्ण झाले आहेत.

6 ऑक्टोबर रोजी जिल्ह्यात एकाच दिवसात 4 हजार 103 शेतकऱ्यांच्या 10 हजार 350.57 हेक्टर क्षेत्राचे पंचनामे करण्यात आले. त्यामुळे दुष्काळामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांच्या नुकसानीची नोंद प्रशासनाकडून वेगाने केली जात असल्याचे चित्र आहे.

अकोट तालुक्यात सर्वाधिक क्षेत्राचे पंचनामे

आतापर्यंत झालेल्या पंचनाम्यांमध्ये अकोट तालुका आघाडीवर असून 37 हजार 420 शेतकऱ्यांच्या 57 हजार 583.32 हेक्टर क्षेत्राचे पंचनामे झाले आहेत. तालुक्यातील एकूण क्षेत्रापैकी 81.52 टक्के क्षेत्राचे पंचनामे पूर्ण झाले आहेत.

तर अकोला तालुक्यात 31 हजार 727 शेतकऱ्यांच्या 47 हजार 909.72 हेक्टर, बाळापूरमध्ये 23 हजार 28 शेतकऱ्यांच्या 42 हजार 884.65 हेक्टर, बार्शीटाकळीमध्ये 24 हजार 18 शेतकऱ्यांच्या 39 हजार 278.29 हेक्टर आणि मुर्तीजापूरमध्ये 30 हजार 507 शेतकऱ्यांच्या 46 हजार 866.22 हेक्टर क्षेत्राचे पंचनामे करण्यात आले आहेत.

पातूर तालुक्यात 26 हजार 496 शेतकऱ्यांच्या 35 हजार 453.55 हेक्टर, तर तेल्हारा तालुक्यात 21 हजार 811 शेतकऱ्यांच्या 36 हजार 349.66 हेक्टर क्षेत्राचे पंचनामे पूर्ण झाले आहेत.

पातूरमध्ये सर्वाधिक टक्केवारी

एकूण क्षेत्राच्या तुलनेत पंचनामे पूर्ण करण्याच्या टक्केवारीत पातूर तालुका 83.80 टक्क्यांसह जिल्ह्यात आघाडीवर आहे. त्यानंतर अकोट 81.52 टक्के, तेल्हारा 76.22 टक्के, अकोला 74.76 टक्के, बाळापूर 72.18 टक्के, बार्शीटाकळी 71.32 टक्के आणि मुर्तीजापूर 68.84 टक्के अशी स्थिती आहे.

दरम्यान, पावसाअभावी खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याच्या पार्श्वभूमीवर पंचनाम्यांचा अहवाल शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा ठरणार आहे. पंचनामे पूर्ण झाल्यानंतर प्रत्यक्ष नुकसानीची नोंद, पात्रता आणि शासनाकडून मिळणाऱ्या मदतीबाबत पुढील प्रक्रिया होणार आहे. अकोला जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या शेतीचे पंचनामे तात्काळ पूर्ण करण्यात येतील अशी आश्वासन जिल्हाधिकारी वर्षा मीना यांच्यातर्फे देण्यात आले आहे.

Related Article

दुचाकी-ट्रकची जोरदार धडक; २२ वर्षीय युवक गंभीर जखमी, प्राथमिक उपचारानंतर अकोल्यातील सर्वोपचार रुग्णालयात हलविले

अकोला जिल्ह्यात दुष्काळी पंचनाम्यांना वेग; आतापर्यंत 1.85 लाख शेतकऱ्यांच्या 3.06 लाख हेक्टर क्षेत्राचे पंचनामे

महिला सक्षमीकरणाला बाळापूर नगरपालिकेची चालना; १०० महिलांना शिलाई प्रशिक्षणाची प्रमाणपत्रे

पातूरमध्ये शाळेतील प्रवेशासाठी १० ते १५ हजार रुपयांची मागणी? खासगी शाळांवर पालकांचे गंभीर आरोप

अकोला शहरात पाणीटंचाईचा इशारा; नवीन बोअरवेल खोदण्यावर बंदी, व्यावसायिक वापरावर निर्बंध

दिग्रस खुर्दमध्ये १२ एकरांतील सोयाबीनची गंजी पेटवली; शेतकऱ्याचे ४ ते ५ लाखांचे नुकसान

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!