Ads

महिला सक्षमीकरणाला बाळापूर नगरपालिकेची चालना; १०० महिलांना शिलाई प्रशिक्षणाची प्रमाणपत्रे

By Nilesh Sir

October 6, 2026 2:16 pm

Ads

अकोला न्यूज नेटवर्क ब्युरो दिनांक ६ ऑक्टोबर २०२६ बाळापूर प्रतिनिधी गणेश सुरदुसे :- महिलांना आत्मनिर्भर आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याच्या उद्देशाने महिला व बालकल्याण विभागाच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या महिला सक्षमीकरण उपक्रमाला बाळापूर शहरात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. रविवार, दि. ४ ऑक्टोबर रोजी सय्यदपुरा येथील अन्सारी क्लिनिकमध्ये आयोजित कार्यक्रमात १०० महिलांना शिलाई प्रशिक्षण पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.

या प्रमाणपत्र वितरणामुळे महिलांच्या कौशल्याला अधिकृत मान्यता मिळण्यासोबतच त्यांना स्वयंरोजगाराच्या माध्यमातून आर्थिक स्वावलंबनाचा मार्ग खुला झाला आहे. विशेष म्हणजे, रविवारच्या १०० प्रमाणपत्रांसह मागील पाच महिन्यांत तब्बल ५०० महिलांना शिलाई प्रशिक्षणाची प्रमाणपत्रे देण्यात आली आहेत. महिलांना केवळ प्रशिक्षण देण्यापुरते मर्यादित न राहता त्यांच्या कौशल्याला रोजगाराची दिशा देण्याचा हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरत आहे.

कार्यक्रमाला नगराध्यक्षा डॉ. आफ्रिन परवीन जम्मू शेट, शिक्षण सभापती डॉ. सामिया शजर, महिला व बालकल्याण सभापती रुखसाना परवीन, पाणीपुरवठा सभापती हिना परवीन, सौद अहमद, नगरसेविका अर्पिता शरद उमाळे, मतीन अहमद, इर्शाद हुसेन तसेच डिजिटल जनसेवा केंद्राचे अभिषेक डोंगरे यांची उपस्थिती होती.

महिलांच्या हाताला कौशल्य, कौशल्याला रोजगार आणि रोजगारातून कुटुंबाला आर्थिक आधार देण्याच्या उद्देशाने राबविण्यात येणारी ही महिला सक्षमीकरण मोहीम बाळापूरमध्ये महत्त्वपूर्ण ठरत आहे. शिलाई प्रशिक्षणाच्या माध्यमातून महिलांना घरबसल्या स्वयंरोजगाराची संधी उपलब्ध होऊ शकते. त्यामुळे महिलांच्या आर्थिक स्वावलंबनासोबतच त्यांच्या कुटुंबाच्या आर्थिक स्थितीलाही हातभार लागण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

मागील पाच महिन्यांत ५०० महिलांना शिलाई प्रशिक्षणाचे प्रमाणपत्र देण्यात आल्याने या उपक्रमाची व्याप्तीही अधोरेखित झाली आहे. महिलांना कौशल्याधारित प्रशिक्षण देऊन त्यांना रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने अशा उपक्रमांना सातत्य देण्याची गरज व्यक्त होत आहे.

Related Article

दुचाकी-ट्रकची जोरदार धडक; २२ वर्षीय युवक गंभीर जखमी, प्राथमिक उपचारानंतर अकोल्यातील सर्वोपचार रुग्णालयात हलविले

अकोला जिल्ह्यात दुष्काळी पंचनाम्यांना वेग; आतापर्यंत 1.85 लाख शेतकऱ्यांच्या 3.06 लाख हेक्टर क्षेत्राचे पंचनामे

महिला सक्षमीकरणाला बाळापूर नगरपालिकेची चालना; १०० महिलांना शिलाई प्रशिक्षणाची प्रमाणपत्रे

पातूरमध्ये शाळेतील प्रवेशासाठी १० ते १५ हजार रुपयांची मागणी? खासगी शाळांवर पालकांचे गंभीर आरोप

अकोला शहरात पाणीटंचाईचा इशारा; नवीन बोअरवेल खोदण्यावर बंदी, व्यावसायिक वापरावर निर्बंध

दिग्रस खुर्दमध्ये १२ एकरांतील सोयाबीनची गंजी पेटवली; शेतकऱ्याचे ४ ते ५ लाखांचे नुकसान

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!