Ads

वांगरगावात खळबळ! पूर्णा नदीत ४४ वर्षीय व्यक्तीचा बुडून मृत्यू

By Nilesh Sir

August 30, 2026 8:04 pm

Ads

तेल्हारा तालुक्यातील वांगरगाव येथे पूर्णा नदीत एक व्यक्ती बुडाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. ही घटना आज, दि. ३० ऑगस्ट २०२६ रोजी घडल्याची माहिती मिळाली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

प्राथमिक माहितीनुसार, पुरषोत्तम रमेश मानकर (वय ४४, रा. कारला, ता. अंजनगाव, जि. अमरावती) हे पूर्णा नदीत बुडाल्याची माहिती समोर आली आहे.घटनेची माहिती मिळताच तेल्हारा पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत पुढील तपास सुरू केला आहे. पुरषोत्तम मानकर हे नेमक्या कोणत्या परिस्थितीत नदीत बुडाले, याबाबत पोलिसांकडून तपास करण्यात येत आहे.

सध्या मिळालेली माहिती प्राथमिक स्वरूपाची असून, घटनेबाबत अधिकृत तपशील पोलिसांच्या पुढील तपासानंतर स्पष्ट होणार आहे. वांगरगाव परिसरात या घटनेची माहिती पसरताच नागरिकांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे. पुरुषोत्तम रमेश मानकर यांचा नदीत बुडाल्याचा प्रकार नेमका कसा घडला, याचा तपास तेल्हारा पोलिसांकडून सुरू आहे.

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!