अकोट : अकोट ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बोर्डी येथील भवानी विद्युत रोहित्रावर काम करत असताना कंत्राटी कामगार संतोष प्रल्हाद इंगळे (वय ४५) यांचा विजेचा जोरदार धक्का लागून जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या दुर्घटनेने विद्युत विभागाच्या कामकाजावर आणि सुरक्षाव्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह उभे केले आहे.
रोहित्रावर काम सुरू असताना संबंधित भागातील वीजप्रवाह पूर्णपणे बंद ठेवणे ही प्राथमिक सुरक्षा खबरदारी मानली जाते. मात्र, काम सुरू असतानाच पुन्हा विद्युत प्रवाह सुरू झाल्याने संतोष इंगळे यांना विजेचा जबर धक्का बसला आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे नेमका वीजप्रवाह कसा सुरू झाला, याचा शोध घेणे अत्यंत महत्त्वाचे ठरले आहे.पुढील अपडेट्स लवकरच..!* पण त्यासाठी खालील लिंक वर क्लिक करून ग्रुप जॉईन करा; आणि हो ही महत्त्वपूर्ण माहिती जास्तीत जास्त शेअर करा…!_

या अपघाताची तीव्रता इतकी भीषण होती की, विजेच्या धक्क्यामुळे संतोष इंगळे यांच्या एका हाताचा पंजा पूर्णतः तुटून पडल्याची माहिती आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत असून, एका कुटुंबाचा आधार क्षणार्धात हिरावला गेला आहे.
मात्र, या घटनेतील सर्वात गंभीर प्रश्न आता समोर येत आहे तो म्हणजे काम सुरू असताना वीजप्रवाह पुन्हा सुरू करण्याची वेळच का आली? वीजपुरवठा बंद असल्याची खात्री करूनच कर्मचारी रोहित्रावर काम करत होते का? वीजप्रवाह बंद करण्याची आणि पुन्हा सुरू करण्याची प्रक्रिया नियमानुसार झाली होती का? संबंधित यंत्रणांमध्ये योग्य समन्वय होता का? या सर्व प्रश्नांची उत्तरे तपासातून समोर येणे गरजेचे आहे.पुढील अपडेट्स लवकरच..!* पण त्यासाठी खालील लिंक वर क्लिक करून ग्रुप जॉईन करा; आणि हो ही महत्त्वपूर्ण माहिती जास्तीत जास्त शेअर करा…!_
केवळ अपघात म्हणून या घटनेकडे पाहून प्रकरण मिटविणे योग्य ठरणार नाही. कारण विद्युत रोहित्रावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्याच्या सुरक्षिततेचा थेट संबंध वीजप्रवाह बंद ठेवण्याच्या प्रक्रियेशी असतो. त्यामुळे या दुर्घटनेमागे मानवी चूक, निष्काळजीपणा किंवा सुरक्षेच्या नियमांकडे झालेले दुर्लक्ष आहे का, याची सखोल चौकशी होणे आवश्यक आहे.
दरम्यान, मृतदेह अकोट ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी आणण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास अकोट ग्रामीण पोलीस करीत आहेत. पुढील अपडेट्स लवकरच..!* पण त्यासाठी खालील लिंक वर क्लिक करून ग्रुप जॉईन करा; आणि हो ही महत्त्वपूर्ण माहिती जास्तीत जास्त शेअर करा…!_
तपासातून वीजप्रवाह नेमका कसा आणि कोणत्या परिस्थितीत पुन्हा सुरू झाला, तसेच या दुर्दैवी मृत्यूला जबाबदार कोण, याचा उलगडा होणार का, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. एका कर्मचाऱ्याचा जीव गेला आहे; त्यामुळे या घटनेतील प्रत्येक प्रश्नाचे उत्तर आता तपासातून स्पष्ट होणे गरजेचे आहे.






Leave a Comment