Ads

बेलगावात अवैध दारूविक्रीवर डोणगाव पोलिसांचा छापा; ५२ हजारांचा मुद्देमाल जप्त

By Nilesh Sir

August 21, 2026 9:05 am

Ads

बुलढाणा जिल्ह्यातील बेलगाव येथे विनापरवाना देशी दारूची विक्री करणाऱ्यावर डोणगाव पोलिसांनी कारवाई केली. या कारवाईत देशी दारूच्या ३०० सीलबंद बाटल्या आणि दुचाकीसह एकूण ५२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

परशुराम किशोर अतिक्रम (वय ३८, रा. अपेनपल्ली, मेदक, तेलंगणा; ह.मु. बेलगाव) हा विनापरवाना देशी दारूची विक्री करीत असल्याची माहिती डोणगाव पोलिसांना मिळाली होती. मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी १८ ऑगस्ट रोजी दुपारी साडेबारा वाजताच्या सुमारास बेलगाव येथे छापा टाकला.

या कारवाईदरम्यान पोलिसांनी १२ हजार रुपये किमतीच्या देशी दारूच्या ३०० सीलबंद बाटल्या जप्त केल्या. तसेच दारूविक्रीसाठी वापरली जात असल्याची दुचाकी, अंदाजे ४० हजार रुपये किमतीची, पोलिसांनी ताब्यात घेतली. अशाप्रकारे एकूण ५२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

विनापरवाना दारूविक्रीप्रकरणी डोणगाव पोलिसांनी संबंधितावर कारवाई केली असून, या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

Related Article

अकोल्यातील न्यू तापडिया नगर रेल्वे गेट लवकरच सुरू होणार? उड्डाणपूल जानेवारीअखेर खुला करण्याचे निर्देश

दुष्काळाचा बाजारपेठेला फटका! अकोल्यात डाळींच्या किमतीत १० ते १५ टक्क्यांनी वाढ; तांदळाचे दरही गगनाला

संगीता कुशवाह मृत्यू प्रकरण: सासरच्या तिघांचा अटकपूर्व जामीन फेटाळला; सरकारी वकिलांचा युक्तिवाद ठरला महत्त्वाचा

दुचाकी-ट्रकची जोरदार धडक; २२ वर्षीय युवक गंभीर जखमी, प्राथमिक उपचारानंतर अकोल्यातील सर्वोपचार रुग्णालयात हलविले

अकोला जिल्ह्यात दुष्काळी पंचनाम्यांना वेग; आतापर्यंत 1.85 लाख शेतकऱ्यांच्या 3.06 लाख हेक्टर क्षेत्राचे पंचनामे

महिला सक्षमीकरणाला बाळापूर नगरपालिकेची चालना; १०० महिलांना शिलाई प्रशिक्षणाची प्रमाणपत्रे

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!