Ads

अकोट उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांची मोठी कारवाई!दोन बैलांना जीवदान, गोमांसासह एक आरोपी ताब्यात!

By Nilesh Sir

August 20, 2026 10:10 am

Ads

अकोट शहरात गोवंशाची अवैध विक्री व कत्तलीविरोधात पोलिसांनी पुन्हा एकदा धडक कारवाई केली आहे. शौकतअली चौकासमोरील कुरेशीपुरा परिसरात उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांच्या पथकाने छापा टाकून दोन जिवंत बैलांना कत्तलीपासून वाचविले, तर घटनास्थळावरून सुमारे ६० किलो गोवंशाचे मांस जप्त केले. या कारवाईत एका संशयिताला ताब्यात घेण्यात आले आहे.

दि. २० ऑगस्ट २०२६ रोजी उपविभागीय पोलीस अधिकारी अकोट यांच्या आदेशानुसार उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचे पथक अकोट शहर परिसरात पेट्रोलिंग करीत होते. यावेळी गुप्त बातमीदाराकडून कुरेशीपुरा परिसरात एका घरात गोवंशाची कत्तल करून मांस विक्री केली जात असल्याची माहिती मिळाली.

माहितीची खात्री झाल्यानंतर पोलिसांनी पंचांसह संबंधित ठिकाणी छापा टाकला. घराच्या समोरील खोलीत एक इसम गोवंशाच्या मांसासह आढळून आला. त्याच परिसरात दोन जिवंत बैल आखूड दोराने बांधलेल्या अवस्थेत पोलिसांना दिसून आले. दोन्ही बैल कत्तलीच्या उद्देशाने बांधून ठेवण्यात आल्याचा पोलिसांचा संशय आहे.पोलिसांनी संबंधित इसमाची चौकशी केली असता त्याने आपले नाव अब्दुल नईम अब्दुल रहीम (वय ४२), रा. कुरेशीपुरा, शौकतअली चौक.

नेमका किती मुद्देमाल जप्त?

पंचांसमक्ष केलेल्या कारवाईत पोलिसांनी अंदाजे ६० किलो गोवंशाचे मांस, दोन जिवंत बैल, दोन लोखंडी सुरे, लाकडी दांडा असलेली कुऱ्हाड आणि लाकडी ठोकळा असा मुद्देमाल जप्त केला. जप्त मुद्देमालाची एकूण अंदाजे किंमत ९२ हजार ८०० रुपये असल्याचे नमूद करण्यात आले आहे.

या कारवाईमुळे अकोट शहरात गोवंशाची अवैध विक्री व कत्तलीविरोधात पोलिसांनी पुन्हा एकदा कठोर भूमिका घेतल्याचे दिसून आले आहे. विशेष म्हणजे, अकोट शहर पोलीस हद्दीत गोवंशासंदर्भातील कारवाया वारंवार होत असल्याने अवैध कत्तलीच्या प्रकारांवर पोलिसांचे लक्ष कायम असल्याचे चित्र आहे.

कारवाईदरम्यान उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयातील पोलीस अधिकारी व कर्मचारी, अकोट शहर पोलीस ठाण्याचे कर्मचारी तसेच आरपीपी पथकातीलकारवाईतील पोलीस पथक: पो.हवा. अनिल सिरसाट, पो.हवा. बजरंग इंगळे, पो.हवा. गोपाल निमकर्ड, पो.कॉ. गोविंद अवारे, पो.हवा. गणेश सोळंके तसेच पोकॉ. फिरोज खान, पोकॉ. अक्षय दोड, पोकॉ. रामकृष्ण अहीरकर, पोकॉ. रहेमत पठाण, मपोकॉ. मनिषा सोनवने आणि मपोकॉ. वैष्णवी जाधव यांचा पथकात समावेश होता

Related Article

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!