Ads

लाचखोर उपनिरीक्षक महादेव देशमुख एसीबीच्या जाळ्यात; ३५ हजारांची लाच घेताना रंगेहात अटक

By Nilesh Sir

August 18, 2026 6:19 pm

Ads

कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या पोलीस ठाण्यातच लाचेचा व्यवहार झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ना-हरकत प्रमाणपत्रासाठी कथितरित्या ६५ हजार रुपयांची मागणी आणि तडजोडीनंतर ३५ हजार रुपये स्वीकारताच चान्नी पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक महादेव देशमुख एसीबीच्या जाळ्यात अडकले. अकोला व वाशिम लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या संयुक्त पथकाने मंगळवारी (१८ ऑगस्ट) ही कारवाई करत त्यांना रंगेहात पकडले.

मिळालेल्या माहितीनुसार, माळसूर येथील बिअर शॉपीचे मालक शुभम थिटे यांच्या बिअर शॉपीला वाईन बारचा परवाना मिळविण्यासाठी आवश्यक असलेले ना-हरकत प्रमाणपत्र देण्याच्या मोबदल्यात पोलीस उपनिरीक्षक महादेव देशमुख यांनी कथितरित्या ६५ हजार रुपयांची लाच मागितल्याचा आरोप आहे.

मात्र, तक्रारदार आणि संबंधित अधिकाऱ्यामध्ये तडजोड झाल्यानंतर ३५ हजार रुपये देण्याचे ठरले. यानंतर शुभम थिटे यांनी थेट लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली.

तक्रारीची पडताळणी केल्यानंतर एसीबीच्या पथकाने सापळा रचला. ठरल्याप्रमाणे मंगळवारी १८ ऑगस्ट रोजी चान्नी पोलीस ठाण्यात ३५ हजार रुपयांची लाच स्वीकारताच अकोला व वाशिम एसीबीच्या संयुक्त पथकाने पोलीस उपनिरीक्षक महादेव देशमुख यांना रंगेहात पकडले.

पोलीस ठाण्यातच झालेल्या या कारवाईमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी चान्नी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून पुढील तपास सुरू आहे.लाच मागितल्याचा आरोप आणि एसीबीची थेट कारवाई यामुळे चान्नी पोलीस ठाणे सध्या चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहे.

Related Article

अकोल्यातील न्यू तापडिया नगर रेल्वे गेट लवकरच सुरू होणार? उड्डाणपूल जानेवारीअखेर खुला करण्याचे निर्देश

दुष्काळाचा बाजारपेठेला फटका! अकोल्यात डाळींच्या किमतीत १० ते १५ टक्क्यांनी वाढ; तांदळाचे दरही गगनाला

संगीता कुशवाह मृत्यू प्रकरण: सासरच्या तिघांचा अटकपूर्व जामीन फेटाळला; सरकारी वकिलांचा युक्तिवाद ठरला महत्त्वाचा

दुचाकी-ट्रकची जोरदार धडक; २२ वर्षीय युवक गंभीर जखमी, प्राथमिक उपचारानंतर अकोल्यातील सर्वोपचार रुग्णालयात हलविले

अकोला जिल्ह्यात दुष्काळी पंचनाम्यांना वेग; आतापर्यंत 1.85 लाख शेतकऱ्यांच्या 3.06 लाख हेक्टर क्षेत्राचे पंचनामे

महिला सक्षमीकरणाला बाळापूर नगरपालिकेची चालना; १०० महिलांना शिलाई प्रशिक्षणाची प्रमाणपत्रे

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!