Ads

गांधीग्राममध्ये कावडधाऱ्यांचा महापूर; पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त, १५ CCTV कॅमेऱ्यांचा वॉच!

By Nilesh Sir

August 16, 2026 8:10 pm

Ads

श्रावण महिन्याचा पहिला सोमवार उद्या असल्याने गांधीग्राम येथील पूर्णा नदीघाटावर रविवारी सायंकाळपासूनच कावडधारी भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. अकोट, अकोला तसेच ग्रामीण भागातून मोठ्या संख्येने भाविक पूर्णा नदीपात्रात जल भरण्यासाठी गांधीग्राममध्ये दाखल झाले आहेत.अशाच ताज्या, विश्वासार्ह आणि सर्वात आधी स्थानिक बातम्यांसाठी ‘अकोला न्यूज नेटवर्क’च्या WhatsApp ग्रुपला आजच जॉईन करा!
आपल्या परिसरातील प्रत्येक महत्त्वाची अपडेट थेट आपल्या मोबाईलवर मिळवा.

भाविकांची वाढती गर्दी आणि नदीपात्रातील संभाव्य धोका लक्षात घेता पोलिस प्रशासनाने घाट परिसरात कडेकोट बंदोबस्त तैनात केला आहे. अकोट उपविभागीय पोलीस अधिकारी निखिल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली दहीहंडा पोलीस ठाण्याचे ठाणेदार गोपाल ढोले यांच्यासह पोलिस अधिकारी व कर्मचारी घाट परिसरात तैनात आहेत.

विशेष म्हणजे, घाट परिसरातील प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवण्यासाठी तब्बल १५ CCTV कॅमेऱ्यांचा वॉच ठेवण्यात आला आहे. गर्दीचे व्यवस्थापन, भाविकांची सुरक्षितता आणि कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी पोलिसांकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे.

यासोबतच आपत्ती व्यवस्थापन पथक आणि रुग्णवाहिका घाट परिसरात सज्ज ठेवण्यात आली आहे. नदीपात्रात जल भरण्यासाठी उतरणाऱ्या भाविकांच्या सुरक्षेला प्रशासनाने सर्वोच्च प्राधान्य दिले आहे.अशाच ताज्या, विश्वासार्ह आणि सर्वात आधी स्थानिक बातम्यांसाठी ‘अकोला न्यूज नेटवर्क’च्या WhatsApp ग्रुपला आजच जॉईन करा!आपल्या परिसरातील प्रत्येक महत्त्वाची अपडेट थेट आपल्या मोबाईलवर मिळवा.

रविवार रात्री पासून कावडधारी भाविक जल घेऊन महादेवाला अभिषेक करण्यासाठी रवाना होणार असल्याने गांधीग्राम परिसरात आणखी मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे भाविकांनी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे आणि नदीपात्रात सुरक्षितता बाळगावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

एकीकडे भक्तीचा उत्साह… तर दुसरीकडे सुरक्षेचा कडेकोट पहारा! गांधीग्रामच्या पूर्णा नदीघाटावर श्रावण सोमवारसाठी प्रशासन पूर्णपणे सज्ज झाले आहे.

Related Article

अकोल्यातील न्यू तापडिया नगर रेल्वे गेट लवकरच सुरू होणार? उड्डाणपूल जानेवारीअखेर खुला करण्याचे निर्देश

दुष्काळाचा बाजारपेठेला फटका! अकोल्यात डाळींच्या किमतीत १० ते १५ टक्क्यांनी वाढ; तांदळाचे दरही गगनाला

संगीता कुशवाह मृत्यू प्रकरण: सासरच्या तिघांचा अटकपूर्व जामीन फेटाळला; सरकारी वकिलांचा युक्तिवाद ठरला महत्त्वाचा

दुचाकी-ट्रकची जोरदार धडक; २२ वर्षीय युवक गंभीर जखमी, प्राथमिक उपचारानंतर अकोल्यातील सर्वोपचार रुग्णालयात हलविले

अकोला जिल्ह्यात दुष्काळी पंचनाम्यांना वेग; आतापर्यंत 1.85 लाख शेतकऱ्यांच्या 3.06 लाख हेक्टर क्षेत्राचे पंचनामे

महिला सक्षमीकरणाला बाळापूर नगरपालिकेची चालना; १०० महिलांना शिलाई प्रशिक्षणाची प्रमाणपत्रे

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!