अकोट : विश्व हिंदू परिषद व बजरंग दल अकोट तालुक्याच्या वतीने १४ ऑगस्ट रोजी सायंकाळी ४ वाजता ‘अखंड भारत’ मशाल रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. नरसिंग महाराज मंदिर येथून या रॅलीला सुरुवात होणार असून शहरातील प्रमुख मार्गांवरून मशाल रॅली काढण्यात येणार आहे.
रॅलीची सुरुवात नरसिंग महाराज मंदिर येथून होऊन नया प्रेस, सत्यविजय टॉकीजसमोरून अकोला रोड, श्री शिवाजी महाराज चौक, बस स्टँड रोड, लक्झरी स्टँडसमोरून लकडगज मार्गे हिवरखेड रोड असा रॅलीचा मार्ग राहणार आहे.
यानंतर रॅली पुन्हा श्री शिवाजी महाराज चौक, सोनू चौक, जयस्तंभ चौक, पटेल चौक, यात्रा चौक, कालंका चौक, स्वा. वीर सावरकर चौक, सोमवार वेस आणि बळीराम चौक मार्गे पुढे जाणार आहे.
रॅलीचा समारोप श्री राम मंदिर, मोठे बारगन येथे करण्यात येणार आहे. अखंड भारताच्या संकल्पनेचा संदेश देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या या मशाल रॅलीत नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन विश्व हिंदू परिषद व बजरंग दल अकोट तालुक्याच्या वतीने करण्यात आले आहे.







Leave a Comment